Navgan News

ताज्या बातम्यासंपादकीय

Video:सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !


संपादकीय भूमिका

भारतात कधीतरी असे होईल का ?

 

रियाध (सौदी अरेबिया) : सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या रमझान मासाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे.

 

सौदीच्या इस्लामी प्रकरणाचे मंत्री शेख डॉक्टर अब्दुल लतीफ बिन अब्दुलअजीज अल-अलशेख यांच्याकडून १० सूत्री निर्देश प्रसारित करण्यात आले आहेत. यामध्ये नमाजपठण थोडक्यात आणि रात्री पूर्ण वेळेत करण्यासह मुलांना मशिदीत न आणण्याच्या निर्देशांचा समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *