Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर…; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

घरगुती गणपती विसर्जनानंतर नोकरदार वर्गाची मुंबईकडे जाण्याची लगबग सुरू झाली आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, प्रवाशांच्या गर्दीने तिकीट दर आज २७०० रुपयांवर पोहोचला.

मध्यवर्ती बसस्थानकावर तशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी.चे कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठीचा तिकीट दर ९१० रुपये आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने नोकरदार व व्यावसायिक कोल्हापुरात दाखल झाले होते. घरगुती उत्सवानंतर त्यांची मुंबईकडे परतीची वाट सुरू झाली आहे. शहरातील खासगी आराम बसेसचा तिकीट दर वाढला आहे. जिल्ह्यात साडेपाचशे खासगी आराम बसेस असून, निव्वळ मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसेची संख्या सुमारे २५ ते ३० आहे.

गोवा, बंगळूर, गडहिंग्जलवरून येणाऱ्या बसेसचा आकडा वेगळा आहे. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने बहुतांश नोकरदारांना मुंबईकडे जाण्यासाठी सुमारे २७०० रुपये मोजावे लागल्याचे चित्र होते. इतरवेळी हा तिकीट दर ७५० ते ८०० रुपये असतो. गर्दीमुळे तिकिटाच्या दरात वाढ झाली असून, आज (ता. २१) हा तिकीट दर दोन हजारांखाली येईल, असे सांगण्यात आले.

‘एसटीच्या दरापेक्षा दीडपटहून अधिक भाडे आकारण्यास खासगी आराम बसचालकांना बंदी आहे. मात्र, प्रवाशांकडून दीडपटपेक्षा अधिक दर आकारल्याची तक्रार आलेली नाही. तरीही नियमांचे उल्लंघन करून कोणी जादा भाडे आकारत असेल तर ते चुकीचे आहे. संघटनेकडे तशी अधिकृत तक्रार आल्यास संबंधित चालकावर कारवाई करण्यात येईल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *