
अहिल्यानगर : Ahilya Nagar Crime
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कात्रीने वार करत निघृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राणी सतीश खेडकर (वय- २९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
मृत राणीचे वडील सुखदेव ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. (Murder Case)
त्यानुसार आरोपी पती सतीश भास्कर खेडकर (वय- ३३) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी (दि.९) पहाटे ही घटना घडली. खेडकर दाम्पत्याला ७ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. (Husband Kill Wife)
अधिक माहितीनुसार, आरोपी सतीश खेडकर याने चारित्र्याच्या संशयातून रागाच्या भरात पत्नीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार करत तिचा खून केल्याची घटना राहत्या घरी घडली. खून केल्यानंतर सतीश खेडकर स्वतः पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर होत त्याने हत्येची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.