अमेरिका : (आशोक कुंभार ) पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. यात जराही कमतरता आली तर नातं तुटतं. प्रत्येक जोडीदाराची हीच इच्छा असते की, त्यांचा जोडीदार त्यांच्यासोबत इमानदार रहावा.
अशात जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एक पत्नीच आपल्या पतीला दुसऱ्या महिलेकडे पाठवते तर तुम्हाला धक्का बसेल.
ही अजब घटना आहे अमेरिकेतील. येथील पत्नीने दावा केला की, आपलं नातं मजबूत करण्यासाठी ती तिच्या पतीच्या सगळ्या आनंदाची काळजी घेते. अशाच आनंदापैकी एक आहे पतीचं दुसऱ्या महिलांसोबत फ्लर्ट करणं. त्याची ही इच्छा पत्नी पूर्ण करते आणि ती तिच्या पतीला दुसऱ्या महिलांसोबत शेअर करण्यासही मागे हटत नाही.
मिररच्या एका रिपोर्टनुसार, मोनिका हल्ट (Monica Huldt) नावाच्या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या अजब वैवाहिक जीवनाबाबत सांगितलं. ती म्हणाली की, ती एक डिडिकेटेड वाइफ आहे आणि तिचं काम फक्त आणि फक्त आपल्या पतीची काळजी घेणं आहे. ती ते सगळं करते ज्याने पतीला आनंद मिळेल. अशात तिने तिच्या पतीला दुसऱ्या महिलांसोबत अफेअर करण्यासही रोखलं नाही. जेव्हा ती घरातील काम करत असते ती पतीला त्याच्या गर्लफ्रेंडकडे पाठवते आणि जसं तिचं काम संपतं पती घरी परत येतो. मोनिका सांगते की, जर पतीला यात आनंद मिळतो तर तिला त्यात आनंद आहे.
मोनिका हल्टनुसार, जेव्हा ती घरात काम करत असते तेव्हा ती पतीला वेळ देऊ शकता नाही. अशात तिचं कर्तव्य आहे की, तिने पतीची काळजी घ्यावी. तिने एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देऊन आपल्या जीवनाबाबत सांगितलं होतं. ती घरात काम करत असताना चांगलं मेकअप करते आणि चांगले कपडे घालून असते. जेणेकरून पतीला चांगलं वाटावं. इतकंच नाही तर तिने हेही सांगितलं की, आपल्या आईचं म्हणणं ऐकून ती स्वत:ला मेंन्टेन ठेवते.