Navgan News



Add Space

क्राईम

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक…

Spread the love

मुलीला दिले सिगारेटचे चटके
बापाविरोधात गुन्हा दाखल
मिसारवाडीत संतापजनक प्रकार

 

छत्रपती संभाजीनगर : ज्या वडिलांकडून सुरक्षिततेची अपेक्षा असते, त्याच्याकडूनच दहा वर्षीय मुलीचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

मिसारवाडी परिसरात राहणाऱ्या मुलीच्या अंगावर थंड पाणी टाकून तिच्या हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याची तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सोपान नरळे यांनी दिली. या प्रकरणात १० वर्षीय पीडित मुलीच्या २४ वर्षीय भावाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे पत्नीसोबत राहुन पेंटर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. तर त्याचे लहान भाऊ व १० वर्षीय पीडित बहिण नराधम बापासोबत राहतात. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१६ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी फोन करून पीडित मुलगी आणि वडील घरी दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वडिलांच्या घरी जाऊन पाहिले; मात्र दोघेही तेथे आढळले नाहीत. त्यामुळे त्याने दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान, जहागीर कॉलनी, जटवाडा रोड परिसरात राहणाऱ्या मावस बहिणीचा फोन आला. तिने पीडित मुलगी त्या परिसरात आल्याचे सांगितले. फिर्यादी तेथे पोहोचला असता पीडिता त्याला दिसली. भावाला पाहताच ती रडू लागली.

मुलीच्या डोक्यावरील केसही कापले

भावाने विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरी वडिलांनी अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले, अंगावर थंड पाणी टाकले आणि हातापायांना सिगारेटचे चटके दिले, असे पीडितेने भावाला सांगितल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापून विनयभंग केल्याचाही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. मुलीने सांगितलेल्या प्रकारानंतर फिर्यादीने सिडको पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीनंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोपान नरळे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून मानव जातीला काळीमा पासणाऱ्या घटनेचा निषेध होत आहे.