
लातूर : खासगी फायनान्सच्या कर्जास कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंकुलगा राणी येथे सोमवारी घडली.
दत्ता सूर्यकांत कुंभार असे या युवकाचे नाव आहे.
कुटुंबाला कर्जमाफी द्या.. : दत्ता कुंभार यांनी फायनान्सच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. शासनाने कुटुंबाला आधार देत कर्जमाफी करावी, अशी विनंती त्यांनी केली.
६ लाख २० हजार रुपयांचे होते कर्ज पोलिसांनी सांगितले की, दत्ता कुंभार यांनी तीन ते चार खासगी फायनान्सचे एकूण ६ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याच कर्जाच्या विवंचनेला आणि त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेची माहिती चुलते चंद्रकांत कुंभार यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिस पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा अंकुलगा राणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले



