सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रामार्फत सोमवार पासून होणार नीट UG 2022 ऑनलाईन नोंदणी चे 5 दिवसीय भव्य शिबीर
सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रामार्फत सोमवार पासून होणार नीट UG 2022 ऑनलाईन नोंदणी चे 5 दिवसीय भव्य शिबीर
परळी तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा- विश्वजीत मुंडे
विद्यार्थ्यांना मिळणार मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी सखोल मार्गदर्शन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांंना नीट UG 2022 चा ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरण्यासाठी अपुरी माहिती असल्यामुळे अडचणी येत आहेत व विद्यार्थ्यांंना व पालकांना अनंत समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच आर्थिक फटका सुद्धा बसत आहे. याचेच भान ठेवत परळी शहरातील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.02 मे 2022 ते 6 मे 2022 पर्यंत परळी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त 70 रुपये मध्ये ऑनलाइन नोंदणी करून विद्यार्थ्यांंना मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची अचूक माहिती विनामूल्य मिळावी यासाठी या 5 दिवसीय भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 2021-2022 या शैक्षणिक वर्षात विश्वजीत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 40+ विद्यार्थी महाराष्ट्रासह तेलंगणा कर्नाटक राज्यात मेडिकल अभ्यासक्रमाच्या M.B.B.S.,B.D.S., B.A.M.S.,B.PTH.,B.Sc. Nursing यास प्रवेश पात्र ठरले आहेत. तसेच 2022-2023 या वर्षात महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे व या राज्यांची प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना परळी च्या बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. बर्याच ठिकाणी अपुरी माहिती असल्यामुळे नीट UG 2022 च्या फॉर्म मध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून दि.02 मे 2022 ते दि.06 मे 2022 सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यंत या वेळेत भव्य शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे कार्यालय डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हॉस्पिटल बस स्टँड- गार्डन रोड, आग्रह हॉटेल च्या समोर होणार आहे.तरी परळी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे (9158363277) यांनी आवाहन केले आहे.