Navgan News



Add Space

ताज्या बातम्याराजकीय

“ते नेते आता.”, काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांबाबत राहुल गांधी यांची मोठी प्रतिक्रिया

निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने दोन आठवडे दणदणीत आंदोलन केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सेवादल, यूथ काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांसोबत चहावर चर्चा केली.

बैठकीत त्यांनी भाजपविरोधातील लढाई, काँग्रेस सोडून इतर पक्षात, विशेषतः भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांविषयी चर्चा केली. त्यांनी पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना धीर ठेवण्याचा आणि लढ्याचा नारा दिला.

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांविषयी…

चाय पे चर्चा, या सत्रात राहुल गांधी यांनी मोठा इशारा दिला. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मोठं मोठी पदं उपभोगणारी आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसवरच टीका करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. बदलेली राजकीय परिस्थिती त्यांच्या लक्षात आली आहे. जनतेच्या मनातील रोषाची, संतापाची जाणीव त्यांना होत आहे. आता त्यांना चूक लक्षात आली असेल असा टोलाही त्यांनी लगावला.

राजकारणात कोणीही मित्र नसतो

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्दावरून राहुल गांधी यांना चिमटा काढला. जे भाजपमध्ये गेले, त्यातील तर काही तुमचे खास मित्र होते. बेस्ट फ्रेंड होते, असा दाखला त्यांनी दिला. त्यावर राहुल गांधी यांनी टिप्पणी केली. राजकारणात कोणीही मित्र नसतो, असे राहुल गांधी यांनी हसत हसत उत्तर दिले. या बैठकीत इतरही अनेक मुद्यांवर हलकी फुलकी चर्चा रंगली. कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न मांडले, त्याला राहुल गांधी यांनी उत्तरं दिली.

मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार यांचाही उल्लेख

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांची एकजुटता आणि भाजपविरोधातील रणनीती यावर चर्चा केली. यावेळी बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचाही उल्लेख झाला. भाजपविरोधात या सर्वांनी काँग्रेसला साथ द्यायला हवी असे राहुल गांधी यांनी म्हटले. मायावती अजूनही भाजपवर थेट हल्लाबोल करत नसल्याचा मुद्दाही या चर्चेदरम्यान रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर इतर नेत्यांनी भाजपविरोधात उघड भूमिका घेतल्याचे कौतुकही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *