Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

2029 मध्ये तुम्ही पंतप्रधान व्हा’; धारच्या तरुणाची शायरी ऐकून राहुल गांधी म्हणाले, ‘I LOVE YOU’

मध्यप्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थी आणि युवकांनी शिक्षण, रोजगार तसेच बेरोजगारीच्या प्रश्नांवर आपले अनुभव मांडले. यावेळी राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशातील काही युवकांना मंचावर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

धार जिल्ह्यातील मनावर येथील रवि वास्कले यानेही मंचावर आपले म्हणणे मांडले. त्याने मध्यप्रदेशातील बेरोजगारी आणि नोकऱ्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर त्याने मंचावरून शायरी सादर केली. ही शायरी ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनी रविकडे पाहत ‘I LOVE YOU’ असे म्हटले.

युवक म्हणाला, ‘2029 मध्ये तुम्ही पंतप्रधान व्हा’

धार जिल्ह्यातील मनावरचा रहिवासी रवि वास्कले हा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात आपली भूमिका मांडण्यासाठी मंचावर आला होता. त्याने दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरून परतताना झालेल्या एका अपघाताचा उल्लेख केला. तसेच मध्यप्रदेशातील बेरोजगारी आणि नोकरी मिळवताना होत असल्याचा आरोप केला जाणारा भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले.

मंचावरून जाताना रविने शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “राहें देखेंगे हम चाहे जमाने लग जाएं, या तो 2029 में आप प्रधानमंत्री बन जाएं या हम ठिकाने लग जाएं.” रविची ही शायरी ऐकल्यानंतर राहुल गांधी हसले आणि त्यांनी रविला ‘I LOVE YOU’ असे म्हणत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे कार्यक्रमातील हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

शिक्षण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी सरकारची : राहुल गांधी

कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले , “शिक्षण व्यवस्था चालवणे आणि त्यात सुधारणा करणे ही सरकारची जबाबदारी आहे, शिक्षण व्यवस्था एखाद्या व्यावसायिकाच्या जबाबदारीचा विषय नाही. देशात यापूर्वी आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालये यांसारख्या संस्था उभारण्यात आल्या. मात्र, सध्या देशभरातील सरकारी शाळा बंद होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काँग्रेसची सरकार असताना शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील 4.6 टक्के निधी दिला जात होता. त्यानंतर हा हिस्सा सातत्याने कमी होत आता 2.6 टक्क्यांवर आला.”

शिक्षण क्षेत्रातील निधी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात पैसा शिक्षण क्षेत्रातून काढून उद्योगपतींना दिला गेल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कमी करण्यात आल्या असून शिक्षकांच्या भरतीतही घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *