Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Pune FDA : पुण्यात रात्रीच्या अंधारात महामार्गावर थरार! १ कोटींचा गुटख्याचा ट्रक पकडला; FDA ची सर्वात मोठी कारवाई

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जप्त केला आहे.

या धडक कारवाईत तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे.

६ तास चालला थरार:

पुणे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांना मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. १८ सप्टेंबर रोजी एफडीएच्या पथकाने संगमनेरपासून राजगुरुनगर टोलनाक्यापर्यंत जवळपास ६ तास या ट्रकचा थरारक पाठलाग केला आणि शेवटी ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळवले.

चौघांवर गुन्हा दाखल;

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नफीस मेहबूब खान (वाहन चालक), निलेश राठी व अरुण पाटील (पुरवठादार), मेसर्स जे. एम. डी. इंटरप्रायझेस (वाहन मालक) आणि संजय माटा (वाहतूकदार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

‘मोक्का’ लावण्याची शिफारस

राज्यात बंदी असलेला गुटखा आणणे हा एका संघटित गुन्हेगारीचा कट असल्याने, या प्रकरणात आरोपींवर ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलीस विभागाला दिली आहे. चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *