Navgan News



Add Space

क्राईमताज्या बातम्यानवगण विश्लेषण

महिलेचा दीरावर जडला जीव, दुधात गुंगीचे औषध मिसळून नवऱ्याला संपवलं अन…

Crime News : महिलेचा तिच्याच दीरावर जीव जडला होता, मात्र त्यांच्या नातेसंबंधात नवरा अडथळा निर्माण करत होता. याच रागातून महिलेनं दुधात गुंगीचे औषध मिसळून त्याची हत्या केली. यानंतर महिलेला आणि तिच्या प्रेयसीला अटक केली.

त्यांच्याकडून गोळ्यांची कागदं देखील जप्त करण्यात आली होती. ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर पोलीस ठाणे येथील हुसैनाबाद भनवाडा येथील आहे.

 

नेमकं काय घडलं?

पोलीस लाईन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेद, ग्रामीण पोलीस अधीक्षक अक्षय संजय महाडिक यांनी सांगितलं की, रतनपुरीतील हुसैनाबाद भानवाडा गावातील रहिवासी अलाउद्दीन यांचा मुलगा, रकीब (वय 28) याचा मृतदेह हा त्याच्याच घरात आढळून आला होता. कुटुंबीयांनी रकीबची पत्नी तबस्सुमवर संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शवविच्छेदन केले असता, अद्याप मृत्यूमागील कारण नेमके काय याबाबत कल्पना दिली नाही.

 

कॉल रेकॉर्ड्स आणि महिलेच्या जबाबातील बदलामुळे प्रकरण उघडकीस

पोलिसांनी तपास केला असता, राकीबचा मेहुणा शाहरुख यांच्यातील फोनवरील संभाषण उघडकीस आले होते. कॉल रेकॉर्ड्स आणि महिलेच्या जबाबात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे हे प्रकरण उघडकीस आली. रकीबची पत्नी तबस्सुम आणि शाहरुख यांचे तीन वर्षांपूर्वी संबंध होते. जेव्हा रकीबला अधिकचा संशय आला असता, त्याने या नात्याला विरोध केला होता.

 

संबंधित प्रकरणात ग्रामीण एसपींनी सांगितलं की, 7 सप्टेंबर रोजी आरोपी शाहरुख हुसैनाबाद येथील सासरच्या घरी आला होता. जेवणानंतर त्याने दुधात मिसळलेल्या गुंगीच्या गोळ्यांचा ओव्हरडोस देत राकीबची हत्या केली. यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *