Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अरेरे. हायड्रोजन रेल्वेकडे प्रवाशांनी फिरवली पाठ, 10 डब्यांमध्ये फक्त 60 प्रवासी

केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे प्रवाशांविनाच धावत आहे. या रेल्वेची क्षमता अडीच हजार प्रवासी घेऊन जाण्याची असताना दररोज या संपूर्ण मार्गावर केवळ 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहेत.

हरियाणातील जिंद ते सोनीपत या 89 किमी मार्गावर ही रेल्वे सध्या धावत आहे.

देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे 17 जुलै 2026 रोजी हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर धावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या रेल्वेला प्रवाशांनी नापसंती दर्शवली असून सध्या संपूर्ण प्रवासादरम्यान केवळ 40 ते 60 प्रवासी या रेल्वेचा वापर करत आहेत. या रेल्वेची प्रवासी क्षमता 2 हजार 600 प्रवाशांची आहे. तरीही या रेल्वेला प्रवासी मिळेना झाला आहे. कमी प्रवासी मिळत असल्याने रेल्वेची एकच फेरी होत आहे. हायड्रोजन रेल्वे एकूण 10 डब्यांची आहे. पूर्ण इंधन भरल्यानंतर ही रेल्वे जवळपास अडीचशे ते तीनशे किमी धावू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *