
बारामती तालुक्यातील चिड आणणारी.. तेवढीच चिंतेची. उपयोगाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला बारामती तालुक्यातील पणदरे येथे एका परराज्यातील महिलेला एकाने दाबून ठेवले असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती मिळाली.
या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांना माहिती दिली शेळीमकर यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या संवेदनशील विषयावर सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला आणि जे दिसून आले ते धक्कादायक होते..
तर घटना अशी होती.. 12 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि माळेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने पणदरे गावातील एका हॉटेलच्या बांधकामा शेजारी जाऊन पाहणी केली, तेव्हा या बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या खोलीत एक पीडित महिला त्यांना दिसून आली. ही महिला घाबरलेली होती. या महिलेला पथकातील कर्मचाऱ्यांनी आधार देऊन चौकशी केली असता, ती मध्यप्रदेशची असून तिचा पती तळेगाव दाभाडे येथील कंपनीत कामाला होता, मात्र काम सुटल्यामुळे तो आपल्या गावी गेला होता आणि ती महिला एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती अशी माहिती मिळाली.
दरम्यान या कंपनीत काम करणाऱ्या एका मैत्रिणीकडून या महिलेची पोपट धनसिंग खामगळ या पणदरे येथील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने पणदरे येथील त्याच्या हॉटेलमध्ये पंधरा हजार रुपये पगार देतो व काम देतो असे सांगून 2 जानेवारी 2025 रोजी या महिलेला बारामतीत बोलावून घेतले आणि त्यानंतर पणदरे येथील काम चालू असलेल्या हॉटेलवर नेले. तिथे नेल्यानंतर 3 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी ही महिला पत्राच्या खोलीत झोपली असताना पहाटेच्या वेळी पोपट खामगळ याने पीडित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व कोणाला काही सांगितले तर खून करेल. तुझ्या देखरेखीसाठी वॉचर नेमले असून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर खूनच करेल अशी धमकी दिली व 11 जानेवारीपर्यंत तो दररोज तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता.
दरम्यान खामगळ याने या महिलेला हॉटेल कामासाठी आलेल्या जोडप्यातील एका महिलेस शरीरसंबंध ठेवण्यासाठी तयार कर असे सांगितले, मात्र पीडित महिलेने तसे न केल्याने खामगळ याने तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोलीमध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व दाबून ठेवले. अखेर पीडित महिलेने तेथे कामास आलेल्या महिलेच्या फोनवरून तिच्या नातेवाईकास फोन केला व सगळा प्रकार सांगितला. त्यावरून या प्रकाराची माहिती पोलिसांना झाली आणि तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोपट खामगळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.
पोपट खामगळ याच्यावर हाच एक गुन्हा नसून यापूर्वी देखील बारामती शहर पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध करून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ, फौजदार संध्याराणी देशमुख, फौजदार देवा साळवे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.