महाकुंभमेळ्यास प्रारंभ,मानवतेचा सर्वात मोठा मेळावा ,”अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लाेक…”

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये आज (दि.१३) भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा सोहळा म्हणून ओळखल्या जाणार्या महाकुंभमेळ्यास प्रारंभ झाला.
यंदाच्या महाकुंभमेळात सुमारे ४० कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या निमित्ताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह जगभरातील माध्यम समूह प्रयागराजमध्ये एकत्र आले आहेत. या महाकुंभ कार्यक्रमाबाबत परदेशी माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी या कार्यक्रमाच्या व्याप्तीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या तयारीचा आढावा घेतला आहे. जाणून घेवूया विदेशातील माध्यम समुहांनी महाकुंभमेळ्याच्या वार्तांकनाविषयी…
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक : सीएनएन
अमेरिकेतील प्रमुख माध्यम समुहांपैकी एक अशा सीएनएन म्हटलं आहे की, प्रयागराजमधील महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे. महाकुंभमेळास येणार्या भाविकांची संख्या अचंबित करणारी आहे. प्रशासन या कार्यक्रमाला केवळ धार्मिक कार्यक्रमाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमही म्हणत आहे. महाकुंभमेळात सेलिब्रिटी आणि परदेशी पर्यटक एकत्र येतात.
Mahakumbh 2025 मानवतेचा सर्वात मोठा मेळावा : बीबीसी
ब्रिटिश मीडिया ग्रुप बीबीसीने या कार्यक्रमाचे वृत्तांकनात म्हटलं आहे की, ही प्रयागराज येथील महाकुंभमेळा हा मानवतेचा सर्वात मोठा मेळावा आहे. वृत्तवाहिनीने प्रयागराजमध्ये विविध देशातील भाविकांशीही संवाद साधला. अर्जेंटिनातून आलेला सेबास्टियन दिएगो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, “प्रत्यक्ष भक्ती काय असते, हे अनुभवण्यासाठी महाकुंभमेळात सहभागी झाला आहे. गंगा नदीने मला बोलावले, म्हणून मी इथे आलो आहे.”
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लाेक प्रयागराजला येणार : AP
असोसिएटेड प्रेस आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, उत्तर प्रदेश राज्यात पुढील ४५ दिवसांमध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा (सुमारे ३४ कोटी) जास्त लोक (अंदाजे ४० कोटी) या महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचणार आहेत. सौदी अरेबियातील मुस्लिमांसाठी पवित्र स्थळे असलेल्या मक्का आणि मदीना येथे दरवर्षी हजसाठी जाणाऱ्या २० लाख लोकांपेक्षा हे २०० पट जास्त आहे. हा कार्यक्रम प्रशासनानसाठी एक मोठी परीक्षा असेल. भारतीय संस्कृती हिंदू धर्मापासून वेगळी नाही.
महाकुंभमेळ्यानिमित्त प्रयागराजमध्ये कडेकाेट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
‘स्काय न्यूज’ने घेतला प्रशासनाचा तयारीचा आढावा
महाकुंभासाठी प्रशासनाच्या तयारीचे जास्तीत जास्त वृत्तांकन स्काय न्यूजने केले आहे. संस्थेने म्हटले आहे की, पहिल्यांदाच कोणत्याही घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक ओळख वापरण्यात येत आहे, ज्यामुळे लोकांची सुरक्षितता सुनिश्चित होण्यास मदत होईल आणि ते हरवल्यास त्यांना शोधणे सोपे होईल.कार्यक्रमादरम्यान लोक स्वच्छ आणि शुद्ध पाण्यात स्नान करतील याची खात्री करण्यासाठी गंगा नदीजवळ पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी यंत्रणा कशी बसवण्यात आली आहे याचाही अहवाल मीडिया ग्रुपने दिला. याशिवाय, १०० खाटांचे एक प्राथमिक रुग्णालय आणि २० खाटांचे दोन रुग्णालये स्थापन करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.