Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

धक्कादायक! दारू पिण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने जन्मदात्या वडिलांची केली हत्या

Spread the love

ऊळगाव राजा : दारू पिण्याच्या वादावरून एका अल्पवयीन मुलाच्या हातून त्याच्या वडिलांचा खून झाल्याची थरारक घटना तीन दिवसापूर्वी घडली. सदर प्रकरणात जालना पोलिसांकडून कागदपत्रे व मेडिकल सर्टिफिकेट उशिरा मिळाल्याने काल ९ जून रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खून प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस अंढेरा पोलिसांनी अटक करून बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. याबाबात प्राप्त माहितीनुसार, मृतकाचा भाचा गणेश भिकाजी उचांडे (वय २५) रा. नवीन मंडपगाव यांनी अंढेरा पोलिसात फिर्याद दिली की, त्याचे मामा मृतक राजू लालमन पेंढारकर (वय ४०) व त्यांचा मुलगा आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून जोरदार भांडण झाले.

दरम्यान मुलाने वडील राजू पेंढारकर यांच्या डोक्यावर मूर्ती मारून गंभीर जखमी केले. त्यांना ५ जून रोजी जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ८ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.

अंढेरा पोलिसांनी गणेश उचांडे यांची फिर्याद व जालना पोलिसांकडून मिळालेल्या पोस्टमार्टेम रिपोर्ट वरून आरोपी मुला विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाच्या आदेशाने आज बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *