ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, पालख्यांचा पंढपूरात प्रवेश


पंढरपूर : संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्‍यात आगमण झाले.

या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांत काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी स्वागत केले.

आषाढ शुद्ध अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्‍याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावला. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे गेला. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा वेळ विसावला. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला गेला. तत्पूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे ठाकूरबुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.

माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचा माउली माउली, टाळ मृदंगाचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.

काही वेळातच माळशिरस तालुक्‍याच्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीची भेट झाली. या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलींच्या पालखी विश्‍वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी यांना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *