चेन्नईतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक विदेशी नागरिक मद्यधुंद अवस्थेत शर्ट काढून भररस्त्यात धिंगाणा घातलाना दिसत आहे. त्यानंतर तो रस्त्यावर वेड्यासारखा धावून, लोकांना चावण्याचा प्रयत्न करीत होता.
त्या व्यक्तीचे असे विचित्र वागणे पाहून रस्त्यावरून जाणारे-येणारे लोकही खूप घाबरले. काहींनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. भररस्त्यात सुरू असलेले त्याचे हे विचित्र वर्तन पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण- तो त्याच्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला चावण्याचा प्रयत्न करीत होता.
हा गृहस्थ इतकी दारू प्याला होता की, त्याला आपण काय अन् कसे वागतोय याचे भान नव्हते. पण, त्याच्या विचित्र वागण्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे काही लोकांनी पोलिसांना या विचित्र घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीला कसेतरी नियंत्रणात आणले.
समोर आलेल्या माहितीनुसार, विदेशी नागरिकांचा एक गट मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी त्यांच्यातील एकाने नशेत विचित्र कृत्ये करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
#drunk #British navy official run half-naked in #chennai and #bite street dwellers. This guy admires Suarez ! #WhatsWrongWithIndia pic.twitter.com/40fhZqNJvg
— Dr. Soham Samajpaty (Modi Ka Parivar) (@SamajpatySoham) April 2, 2024
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिसांनी लोकांच्या मदतीने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विदेशी तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. ही व्यक्ती अमेरिकेची रहिवासी असून, तिचे नाव अलेक्झांडर सिल्वा आहे. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी तो चेन्नईला आला होता. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.