विसर्जन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; किनाऱ्यावर गणेशमूर्तींची विटंबना, पालिका- पोलिसांची धावपळ

वसई किल्ला जेट्टी परिसरात गणेश विसर्जनानंतर गणेशमूर्तीचे अवशेष तुटलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. काही मूर्ती अर्धवट विसर्जित अवस्थेत चिखलात अडकलेल्या दिसून आल्याने या प्रकारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून, विसर्जन व्यवस्थापनाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वसई परिसरातील विविध विसर्जन घाटांवर मोठ्या संख्येने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची संख्या मोठी आहे. समुद्रातील भरती ओहोटी, लाटा आणि चिखलामुळे काही मूर्ती किनाऱ्यावर किंवा उथळ भागात पुन्हा बाहेर येण्याची शक्यता असते.
पुढच्या विसर्जना वेळी दक्षता
वसईतील वरिष्ठ पोलिस निरिक्षक सौरभी पवार म्हणाल्या, “महापालिकेच्या अधिका-यांना याबाबत सूचना दिली असून रात्री सदर गणेश मूर्तीचे विसर्जन उशिराने समुद्राच्या मध्यभागी करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता”.सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर म्हणाल्या ,”भरती ओहोटीमुळे सदरच्या मुर्त्या मुर्त्या बाहेर आल्या होत्या. घेऊन पुन्हा 66 माहिती मिळाल्यानंतर त्या मुर्त्या ताब्यात घेऊन । विसर्जित करण्यात आल्या. या पुढच्या विसर्जना वेळी दक्षता घेण्यात येईल”.
व्यवस्थापन काटेकोर करण्याची ठाकरे गटाची मागणी
गणेशोत्सवात विसर्जनानंतर संबंधित यंत्रणेकडून जेट्टी व किनारपट्टी परिसराची पाहणी करून बाहेर आलेल्या मूर्तीचे अवशेष तातडीने हटवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भाविकांकडून श्रद्धेने आणि विधिवत निरोप देण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीची अशा अवस्थेत विटंबना होऊ नये, यासाठी विसर्जन व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे दत्ता जाधव यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून मूर्तीचे अवशेष ताब्यात घेऊन पुन्हा समुद्रात विसर्जित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील विसर्जनाच्या वेळी अधिक दक्षता घेण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यावरणावर होणार परिणाम
विसर्जनानंतर निर्माल्य, मूर्तीचे अवशेष व इतर पूजासाहित्य समुद्रकिनारी किंवा चिखलात पडून राहू नये, यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन होण्यास बराच कालावधी लागत असल्याने त्यांचे अवशेष समुद्रकिनारी राहिल्यास पर्यावरणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.



