Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सचिन तेंडुलकरशी संबंधित कंपनी आणणार ३ हजार कोटींचा IPO; सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल!

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या स्पिनी या कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल केली आहेत.

स्पिनी हा वापरलेल्या चारचाकी गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. स्पिनीचा या आयपीओच्या माध्यमातून सुमारे ३००० हजार कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे.

स्पिनीच्या या आयपीओमध्ये सध्याच्या भागधारकांकडून ऑफर फॉर सेल आणि नवीन भांडवल उभारणी यांच्या समावेश असण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी आणि ३६० वन वॅम यांची ‘बुक रनिंग लीड मॅनेजर्स’ म्हणून नियुक्ती केली आहे. या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी याची माहिती दिल्याचे वृत्त मनीकंट्रोल या संकेतस्थळाने दिले आहे.

कपंनीचा २०२७ मध्ये आयपीओ आणण्याचा विचार आहे. पण, या आयपीओची कालमर्यादा अजून निश्चित झाली नसून, ती सेबीच्या मंजुरीवर अवलंबून असेल. याचबरोबर सेबीकडून मिळणाऱ्या मंजुरीदरम्यान या आयपीओचा अंतिम आकार आणि रचना यामध्ये बदल होऊ शकतो.

स्पिनीने गेल्या महिन्यात आयपीओच्या तयारीचा भाग म्हणून, आपली मूळ कंपनी व्हॅल्यूड्राइव्ह टेक्नॉलॉजीजचे खाजगी मर्यादित कंपनीतून सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर केले होते.

११ हजार ६०० कोटींची कंपनी

आयपीओ आणण्याच्या विचारात असतानाच कंपनीने गेल्या काही काळात आपला महसूल वाढवला असून, तोटा कमी करण्यात यश मिळवले आहे. कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मधील ३,७३० कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात २५ टक्क्यांनी वाढ होऊन तो ४,६५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा महसूल सुमारे ६,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये त्यात आणखी २५ ते ३० टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. Tracxn संकेतस्थळावरील माहितीनुसार स्पिनीचे मूल्यांकन २०२६ मध्ये ११ हजार ६०० कोटी रुपयांवर पोहचले आहे.

स्पिनीविषयी

२०१५ मध्ये नीरज सिंग, मोहित गुप्ता आणि रामंशु महाौर यांनी स्पिनीची स्थापना केली. सिंग हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी वापरलेल्या चारचाकी गाड्यांची आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी-विक्री, फायनान्सिंग, विमा आणि विक्री-पश्चात सेवांचा समावेश आहे. स्पिनी सध्या दरमहा सुमारे १५,००० गाड्यांची विक्री करते आणि २५ शहरांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *