Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात पुणे मेट्रो सुसाट; एका आठवड्यात २५ लाख प्रवाशांनी घेतला लाभ, कोटींचा महसूल मिळवला

गणेशोत्सवाच्या पहिल्या आठवड्यात पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर प्रवाशांची गर्दी झपाट्याने वाढली. मध्यवर्ती भागात जाण्यासाठी नागरिकांनी मेट्रोला पसंती दिली. गणेशोत्सवाच्या

पहिल्या दिवशी १४ सप्टेंबर रोजी २.६३ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. तर रविवारी, २० सप्टेंबर रोजी ४ लाख प्रवाशांनी मेट्रोमधून प्रवास करण्याचा लाभ घेतला.

गणेशोत्सव सुरु झाल्यापासून १४ ते २० सप्टेंबर या सात दिवसांत मेट्रोने एकूण २५.०७ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आणि सुमारे ३.७९ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. म्हणजे दररोज सरासरी सुमारे ३.५८ लाख प्रवासी आणि सुमारे ५४.१८ लाख रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले. या वाढीत दोन्ही मार्गिकांवर प्रवास केलेल्या प्रवाशांचा समावेश आहे. पर्पल लाइनवर (मार्गिका १) सात दिवसांत १३.४९ लाख प्रवाशांनी प्रवास केला आणि सुमारे २.१९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ॲक्वा लाइनवर (मार्गिका २) ११.५७ लाख प्रवाशांकडून सुमारे १.६१ कोटी रुपये जमा झाले. पर्पल लाइनवरील दैनंदिन प्रवासी १.४५ लाखांवरून २.६९ लाख (सुमारे ८५ टक्के), तर अॅक्वा लाइनवर १.१८ लाखांवरून २.१० लाख (सुमारे ७८ टक्के) झाले. दोन्ही मार्गिकांवर सर्वाधिक प्रवासी १९ सप्टेंबर रोजी नोंदवले गेले.

एकूण प्रवाशांपैकी सुमारे ५४ टक्के आणि महसुलापैकी सुमारे ५८ टक्के वाटा पर्पल लाइनचा होता. ॲक्वा लाइनवर १५ सप्टेंबर रोजी प्रवासी संख्या आदल्या दिवसापेक्षा सुमारे २७ टक्क्यांनी वाढली. या मार्गिकेवर सर्वाधिक महसूल १७ सप्टेंबर रोजी (२६.८१ लाख रुपये), तर पर्पल लाइनवर १८ सप्टेंबर रोजी (३८.२२ लाख रुपये) मिळाला. गणेशोत्सवात १४ ते १८ सप्टेंबरदरम्यान प्रति प्रवासी सरासरी उत्पन्न १६.३ ते १६.५ रुपयांच्या आसपास होते; १९ सप्टेंबर रोजी ते १२.५९ रुपयांपर्यंत घसरले. परिणामी, १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान प्रवासी संख्या ८२ टक्के वाढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *