एका चुकीमुळे वेळ संपत आलीय! संपूर्ण भारताचा बॅलन्स बिघडतोय, भीषण संकटाचा इशारा; WMOच्या रिपोर्टने खळबळ

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) अहवालानुसार भारतातील भूजलाची पातळी सातत्याने खालावत आहे. जमिनीतून जितके पाणी उपसले जात आहे, तितके पाणी पुन्हा जमिनीत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतात भूजलाचा उपसा हा त्याच्या पुनर्भरणापेक्षा अधिक होत असल्याने देशातील पाण्याचे संतुलन बिघडत आहे.
भारतातील भूजल पातळी सातत्याने घसरत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजेच WMO च्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस 2025’ या अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. देशातील अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात भूजल पातळीतील ही घसरण अनेक वर्षांपासून कायम आहे. अहवालानुसार 2022 ते 2025 या कालावधीत भूजलाच्या कमतरतेचा सातत्यपूर्ण कल पाहायला मिळाला आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे की जमिनीतून जितके पाणी काढले जात आहे तितके पाणी पुन्हा जमिनीत पोहोचत नाही. त्यामुळे जलसंतुलन बिघडत आहे. ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही. मात्र भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. शेतीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर भूजलावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे शहरांमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही भूजलाशी संबंधित आहे.
जगभरातील भूजल पातळीही चिंताजनक
WMO च्या अहवालानुसार 2025 मध्ये जगभरातील 34 टक्के भूजल निरीक्षण केंद्रांवर पाण्याची पातळी सामान्यपेक्षा कमी किंवा खूपच कमी नोंदवण्यात आली. 2024 मध्ये हे प्रमाण 25 टक्के होते. म्हणजेच एका वर्षात अशा केंद्रांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे 31 टक्के निरीक्षण केंद्रांवर भूजल पातळी सामान्यपेक्षा अधिक होती. हे आकडे ज्या भागांमध्ये भूजलाची नियमितपणे देखरेख केली जाते, तेथून मिळाले आहेत. भारतातही अशाच प्रकारचा कल दिसून येत आहे.
उत्तर भारतातील जमिनीवरील जलसाठा म्हणजेच ‘टेरस्ट्रियल वॉटर स्टोरेज’ 2025 मध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी राहिला. WMO च्या महासचिव सेलेस्टे साउलो यांनी यासंदर्भात इशारा देताना आपण आपल्या बचत खात्यातील पैसा खर्च करत असल्याची उपमा दिली आहे. जागतिक स्तरावर 2014-2016 या कालावधीनंतर जमिनीवरील जलसाठ्यामध्ये घसरणीचा कल कायम आहे. हा जवळपास एक दशकाचा संकेत आहे.