Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

आधी निमंत्रण नाकारलं, आता स्वतःहून दिल्लीच्या वाटेवर? बांगलादेशच्या तारिक रहमान यांच्या भूमिकेतील ‘यू-टर्न’मागे काय आहे कारण?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध लवकरच सामान्य होण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान ढाका ते नवी दिल्ली दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सीमावाद, तीस्ता नदी, चीनसोबतचे घनिष्ठ संबंध आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रहमान यांना यापूर्वी दोनदा आमंत्रित करण्यात आले होते, परंतु ते उपस्थित राहिले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी सांगितले, “काही अडचणींनंतर चर्चा सुरू झाली आहे. तारिक रहमान यांच्या दिल्ली दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा सुरू आहे. सध्या, कार्यक्रमाचा अजेंडा तयार केला जात आहे.”

भारत दौऱ्यावर कधी येणार?

तारिक रहमान यांचा अजूनही भारत दौऱ्याचे नियोजन समोर आलेले नाही. तरी, हा दौरा नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होऊ शकतो, असे वृत्त आहे. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी, रहमान २१ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींना बांगलादेशच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तम आरोग्य आणि उत्साहासह भारताच्या जनतेची तुमची समर्पित सेवा अशीच सुरू राहो, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *