Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गोकुळ निवडणुकीआधी शोमिका महाडिकांची सतेज पाटलांना थेट ऑफर; सोबत येण्याचे आवाहन

ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या निवडणुका देखील बिनविरोध व्हावी, अशी इच्छा गोकुळ संचालिका शोमिका महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर होताच भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना एक प्रकारे सोबत येण्याचं विधान केले आहे. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.

संस्थाच्या निकालानंतर गोकुळच्या राजकारणात महाडिक गट काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं . पण आता गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या, असं म्हटल्याने गोकुळच्या राजकारणाला नव्याने कलाटणी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला वरिष्ठ नेते बसून ठरवतील. पण महायुतीच्या नेत्यांनी महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असं जाहीर केला आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बिनविरोध निवडणुका होतात, त्याप्रमाणे गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी कार्यकर्ती म्हणून माझी इच्छा.

निवडणूक बिनविरोध होईल की नाही हे सांगता येत नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना निवडणुका बिनविरोध व्हाव्यात ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. म्हणून बिनविरोध निवडणूक व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे.

सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार चालवता आलं तर चांगलं होईल. विरोधी पॅनल करणाऱ्या नेत्यांनी देखील याचा विचार करावा.बिनविरोध निवडणूक व्हावेत ही ठराव धारक आणि सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याचे महाडिक म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *