Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन होणार लंडनमध्ये

मुंबई : जगभरातील मराठी बांधव, उद्योजक आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर जोडण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये भरविण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी गुरुवारी लंडन येथे केली. जगभरातील मराठी भाषकांसाठी मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीतील योगदानाबद्दल शिंदे यांना ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी शिंदे म्हणाले, मराठी माणूस कुठेही गेला तरी माती, भाषा आणि संस्कृतीशी नाते कायम ठेवतो. मराठीचा जागतिक स्तरावर डंका गाजविण्यासाठी आणि जगभरातील मराठी माणसांना जोडण्यासाठी लंडन संमेलन महत्त्वाचे ठरेल.

ढोल-ताशांचा गजर…

महाराष्ट्र भवनातील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, कवी अशोक नायगावकर, डॉ. गोविंद कानेगावकर, वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *