क्राईम

पिंपरी- चिंचवडमध्ये इंजिनिअरिंग तरुणीची आत्महत्या; तपासानंतर धक्कादायक कारण …


पिंपरी चिंचवड परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिपंरीचिंचवडमध्ये घडली.

ही आत्महत्या प्रेमसबंधातून होणाऱ्या (Pimpri) मानसिक त्रासाला कंटाळून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी प्रियकर प्रणव डोंगरेला अटक करण्यात आली आहे.

 

सहिता रेड्डी असं आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव होतं. सहिता आणि प्रणव दोघे ही एकाच नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. प्रणव हा सहिताच्या घरी नेहमी यायचा. पण पालकांना आपली मुलगी प्रेमप्रकरणात पडली आहे याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती. हेच प्रेम सहिताचा काळ ठरलं.

५ जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सहिताने राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावर जाऊन उढी घेत आत्महत्या केली. सहिताने ४२ मिनिटांची व्हॉइस नोट बनवून तिच्या मैत्रिणीला पाठवली. पण मैत्रिणीच्या व्हाट्सअपला दोन तासानंतर व्हॉइस पोहचेल अशी व्हाट्स सेटिंग करून सहिता रेड्डी ने १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

 

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी पोहचले. परंतु, भीतीमुळे सहिताने सुसाईड व्हाईस नोट पाठवली आहे हे तिच्या मैत्रीने पोलिसांना सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांना मैत्रिणीने सविस्तर माहिती दिली. वाकड पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास करून सहिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अखेर या प्रकरणी प्रणव डोंगरेला १३ फेब्रुवारीला अटक केली आहे.

 

प्रणव हा वारंवार सहिता ला प्रेमबंधावरून मानसिक त्रास द्यायचा, शारीरिक छळ करायचा, मी तुझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडेल अशी धमकी देत असायचा. पण पुढे तो तेवढंच जास्त प्रेम करायचा असा उल्लेख सहिताने व्हाईस नोट मध्ये केला होता.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *