क्राईम

कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली, तरी कराडचा 180 दिवस जेलमध्येच असणार मुक्काम


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलं.त्याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले.या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह एकूण 9 आरोपींविरोधात मकोका कायद्यांतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

तर या घटनेतील आणखी एक आरोपी असलेल्या कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. अशातच वाल्मिक कराड (Walmik Karad) विरोधातील कारवाईचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. पण पुढील तब्बल 180 दिवस अर्थात 6 महिने कराडला तुरुंगातून बाहेर येणं शक्य होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

 

वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळी आणि बीड जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. टायर जाळपोळ,ठिय्या आंदोलन,परळी बंदची हाक यांसह जे जे शक्य असेल त्या त्या पर्यायांचा वापर करत कराड समर्थकांनी सरकार तसेच तपासयंत्रणांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो प्रयत्न हाणून पाडत आणि कराड समर्थकांचा दबाव झुगारत तपासयंत्रणांनी आपली कारवाई सुरुच ठेवली आहे.

 

पण कराड समर्थकांनी कितीही वकिलांची मोठी फौज उभी केली तरी वाल्मिक कराड पुढील काही महिने तुरुंगातच (Jail) काढावे लागणार आहे.न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी कराडने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्या तरी मकोका कारवाईमुळे त्याला जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. मकोका कायद्यात आरोपीला कमीत कमी 180 दिवस आरोपी जामीन मिळत नाही. त्यामुळे कराडला किमान पुढचे सहा महिने तरी जेलमध्ये राहण्याची शक्यता आहे.

याआधी न्यायालयानं वाल्मिक कराडला मोठा दणका देतानाच खंडणीच्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. त्यापाठोपाठ संतोष देशमुख हत्याप्रकरणातही कराडची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला देखील स्लीप एपनिया आजार असून त्याला CPAP मशीनची गरज असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्याप्रमाणे न्यायालयाने वाल्मिक कराडला CPAP मशीन देण्याची मागणीला मान्यता दिली आहे.

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्यानं वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.आवादा कंपनीकडे ज्यादिवशी खंडणीची मागणी करण्यात आली, त्याच दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत कराडही दिसून येत असल्याने तपासयंत्रणांना देशमुख हत्येप्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी महत्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. या आजारात झोपेत असतानाच श्वासमार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे CPAP मशीन बाळगावे लागते. तसे न केल्यास जीवावर बेतू शकते असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. या युक्तीवादावरून न्यायालयाने वाल्मिक कराड यास न्यायालयीन कोठडीत CPAP मशीन देण्याचे आदेश दिले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *