
पुण्याच्या चाकण परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत स्टील कंपनी मालकावर गोळीबार झाला आहे. यामध्ये कंपनी मालकाच्या पोटात गोळी लागली आहे.या गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सूरू आहे.
मिळालेल्या माहितीनसुार, पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील कंपनीच्या मालकारवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. कंपनी मालक कंपनीबाहेरच उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला होता. या गोळाबारातर एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागली होती. त्यामुळे जखमी अवस्थेत कंपनी मालक जमीनीवर पडले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर लगेचच कंपनी मालकाला रूग्णालयात दाखल केले आहे. सध्या कंपनी मालकावर डॉक्टर उपचार करत आहे.
चाकणच्या वराळे परीसरात कैलास स्टील कंपनी आहे. या कंपनीच्या मालकारवर ही गोळीबाराची घटना घडली आहे.या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून तपास करायला सूरूवात केली आहे. तसेच हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला? या हल्ल्यामागचे कारण काय? यासोबत हल्लोखोर दुचाकीस्वाराचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरूवात केली आहे.