Navgan News

क्राईम

अनैतिक संबंधात अडसर,नात्याचा-वयाचा विसर पडला, बेडरुम बंद होता, पण कडी नव्हती, त्याचवेळी अचानक तिथे.जे घडलं ते


बेडरुम बंद होता. पण कडी लावलेली नव्हती. त्याचवेळी मध्यवयीन महिला अचानक रुममध्ये आली. समोरच दृश्य पाहून तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. महिलेचा पती आणि सून दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते.

दोघांचा प्रणय सुरु होता. महिलेचा संयम सुटला. ती दोघांवर ओरडली. मी मुलाला सगळं सांगिन अशी धमकी तिने दिली. त्यानंतर जे झालं, ते खूपच भयानक होतं. धमकी देणाऱ्या मध्यमवयीन महिलेचा टॉयलेटच्या टाकीत मृतदेह मिळाला. अहिरौली गावातील जटहा बाजार ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. गुरुवारी संध्याकाळी चौकीदार घुरहू यादवची पत्नी गीता देवी (50) बेपत्ता झाली. सूनबाई गुडियाने पती दीपकला सांगितलं की, कोणीतरी अनोळखी व्यक्ती आली होती. सासूबाई गीता देवी त्याच्यासोबत बाईकवर बसून निघून गेल्या.

 

बराच वेळ होऊनही गीता देवी परतल्या नाहीत, त्यावेळी कुटुंबियांच टेन्शन वाढलं. त्यांनी गावात शोधलं. पण काही पत्ता लागला नाही. घुरहू यादवने शुक्रवारी पोलीस स्टेशनमध्ये पत्नी गीता देवी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु केला.

 

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समजलं?

 

पोलिसांच्या तपासात शनिवारी सकाळी घरातील शौचालयाच्या टाकीत बेपत्ता गीता देवी यांचा मृतदेह सापडला. माहिती मिळताच गावकरी तिथे जमले. टाकीच झाकण हटवून मृतदेह बाहेर काढला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोक्यावर घाव लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याच समोर आलं.

 

तिघांची स्वतंत्र चौकशी केली

 

एसपी संतोष मिश्रा यांनी मृत्यूच कारण शोधण्यासाठी टीम बनवली. सून, मृतक महिलेचा मुलगा आणि पती घुरहू यादव यांची स्वतंत्र चौकशी केली. तिघांनी जे सांगितलं, त्यामध्ये बरच अंतर आढळून आलं. पोलिसांनी मंगळवारी अत्यंत कठोरतेने चौकशी केली. त्यावेळी घुरहू आणि सूनबाईने तोंड उघडलं. पोलीस चौकशीत त्यांनी सांगितलं की, मागच्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये अफेयर सुरु होतं.

 

पोलिसांना पुराव्यामध्ये काय मिळालं?

 

मृतक गीता देवीने दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं होतं. तिने विरोध केला. त्यावरुन वादविवाद सुरु झाला. अनैतिक संबंधात गीता देवीचा अडसर नको म्हणून दोघांनी मिळून गुरुवारी संध्याकाळी तिच्या डोक्यात अर्ध जळालेलं लाकूड मारलं. विटा डोक्यात घातल्या. गीता देवीचा श्वास थांबल्यानंतर घरातीलच पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवला. पोलिसांना हत्येसाठी वापरलेलं लाकूड, विटेचा अर्धा तुकडा मिळाला आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *