ताज्या बातम्या

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन असल्याचे पुरावे


चंद्रमोहीम यशस्वी झाली आहे. भारताचं चांद्रयान-३ मोहिमेचं विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग व्यवस्थित झाली आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे.

याचदरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजनचे पुरावे मिळाले आहेत. तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे.

इस्त्रोने ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. इस्त्रोने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वैज्ञानिक शोध सुरुच आहे. प्रज्ञान रोव्हरवरील लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप इन्स्ट्रुमेंटद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे पुरावे आढळले आहेत’.

 

तसेच ‘Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si आणि O (ऑक्सिजन) याचाही शोध लागला आहे. आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे. LIBS इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे, अशीही माहिती दिली.

दरम्यान, इस्त्रोने वेबसाईटवर २८ ऑगस्ट रोजी एक लेख पब्लिश केला आहे. या लेखात उल्लेख केला आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे पुरावे आढळले आहेत.

दरम्यान, ऑर्बिटवरील उपकरणांद्वारे शोधणे शक्य नव्हते. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावरील मूलभूत संरचनेवर हा प्रयोग करण्यात आला आहे.

चंद्रावर काय-काय मिळालं?

अॅल्यमिनियम, सल्फर, कॅल्शियम, आयरन, क्रोमियम, टाइटेनियम असल्याचे पुरावे आढळले आहेत. तसेच मॅगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याचीही पुरावे आढळले आहेत. आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *