
जास्त प्रमाणात कॉपरच्या भांड्यातले पाणी पिले तरी त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तेव्हा मर्यादित प्रमाणात हे पाणी प्यावे
त्यास हिरवापणा आला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तांब्याचे भांडे लिंबू आणि मीट, किंवा चिंचेच्या पाण्याने धुवावे.
जर रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने तांब्याचे तत्व त्यात वाढते आणि शरीराला त्रास होतो.हे पाणी सकाळीच प्यावे. दिवसभर पिऊ नये.
एसिडीक ज्युस उदा.लिंबाचा रस तांब्याच्या भांड्यात ठेवू नये. त्याने टॉक्सिटी वाढते. त्यामुळे प्लेन वॉटरच तांब्याच्या भांड्यात ठेवावे
महापालिकेच्या पाण्यात क्लोरिन टाकलेले असते. त्यामुळे शहरातील पाणी तांब्याच्या भांड्यात जास्त काळ ठेवू नये. ही काळजी घेतली तर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यदायी ठरु शकते.



