Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्या

”होर्मुझ’ आता आम्ही चालवणार”, डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान, अनेक देशांकडून टोल वसुली करण्याचा मनोदय…

अमेरिका लवकरच ‘होर्मुझ सामुद्रधुनी’च्या संपूर्ण हालचालींवर स्वतःचे थेट नियंत्रण मिळवणार असल्याचं विधान केलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी, ते फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

इराणने १८ जून रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अटी मोडल्याचा थेट आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प म्हणाले की, आम्ही तेहरानवर अत्यंत तीव्र लष्करी हल्ला करण्याच्या तयारीत आहोत. या धोरणात्मक तेल मार्गाची सुरक्षा आता यापुढे मोफत केली जाणार नाही. या मार्गावरून ज्या देशांची व्यापारी आणि तेलाची जहाजे प्रवास करतात, त्या जगातील सर्वच देशांकडून अमेरिकन लष्कर या सुरक्षा व्यवस्थेच्या बदल्यात प्रचंड मोठा आर्थिक मोबदला वसूल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात घालण्याच्या बदल्यात अमेरिका अब्जावधी डॉलर्स कमावण्याच्या तयारीत आहे. ”भारत, चीन, जपान आणि युरोपीय देशांसह जे देश मध्य पूर्वेतून तेल आणण्यासाठी होर्मुझच्या मार्गाचा वापर करतात, त्यांना आता अमेरिकेला मोठी रक्कम मोजावी लागेल. जो देश पैसे देणार नाहीत, त्यांच्या जहाजांच्या सुरक्षेची कोणतीही हमी अमेरिका घेणार नाही.” असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

जर अमेरिकेने या संपूर्ण मार्गावर स्वतःचे थेट लष्करी नियंत्रण प्रस्थापित केले, तर इराणची ही सर्वात मोठी रणनीतिक ताकद कायमची नष्ट होईल आणि इराण हतबल होईल. मात्र, ट्रम्प यांची ही घोषणा प्रत्यक्षात आणणे तितके सोपे नाही, कारण या सागरी मार्गावर इराणच्या अत्यंत आक्रमक ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या लष्कराचे नियंत्रण आहे, जे अमेरिकेला तिथे सहजासहजी घुसू देणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *