महाराष्ट्र

वरुणराजाच्या साक्षीने पुरंदवडे येथे माउलींचे, तर अकलूज येथे तुकोबारायाचे रिंगण संपन्न


ढरपूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण वरुणराजाच्या साक्षीने पुरंदवडे येथे तर तुकोबारायांच्या पालखीचे गोल रिंगण अकलूज येथे संपन्न झाले.

पालखी सोहळा निघाल्यापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली. भाविकांच्या उत्साहाला आलेले उधाण, चैतन्य निर्माण करणाऱ्या आणि नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वातावरण भक्तीमय झाले. उद्या माउलीच्या पालखीचे खडूस येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे मुक्कमी तर संत तुकारम महारज यांच्या पालखीचे माळीनगर येथे उभे रिंगण होऊन बोरगावी मुक्कमी असणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

पालखी सोहळ्यातील परमोच्च क्षण म्हणजे गोल रिंगण. लष्करी शिस्त, ठरलेले ठिकाण, रिंगण लावण्यासाठी चोपदारांचा इशार आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच अश्वांची धाव अशा या नेत्रदीपक रिंगणाची भाविकाना आस लागलेली असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे संपन्न झाले. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि वारा सुटला होता. अशातच दुपारी बाराच्या सुमारास मैदानामध्ये टाळ मृदुंग, डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून महिला, विणेकरी टाळकरी जमा होऊ लागले. त्यानंतर माउलीची पालखी रिंगणाच्या मध्यभागी आली. लगेच माउलीच्या अश्वाचे आगमन झाले. अश्वाची आणि पादुकांची पूजा झाली. चोपदारांनी हातातील दंड गोल फिरवला. उपस्थित भाविकांचा माउली-माउलीचा जयघोष, तसेच टाळ मृदुंगाचा जयघोष सुरु असतानाचा अश्वाने वेगाने धावत गोल फेरी पूर्ण केली आणि मग जमलेल्या भाविकांचा उत्साह अजून वाढला. माउलीच्या अश्वाची पायाची धूळ मस्तकी लावण्याची लगबग झाली. या वैष्णवांच्या उत्साहात वरुणराजा देखील सामील झाला. ज्याची आतुरतेने वाट बघत होते तो पाउस पडू लागल्याने उत्साह द्विगुणीत झाला. जमलेल्या वैष्णवांनी फुगडी, सोंग, आदी खेळ खेळून आपल शीणवठा घालवला.

तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम माहाराज यांचा पालखी सोहळा नीरा नदी ओलांडून शनिवारी सकाळी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले.यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ, रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाने भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला. अकलूज येथे पालखीचे स्वागत फुले उधळून आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालून करण्यात आले, येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी जमले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.दरम्यान, रविवारी माउलीची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खडूस फाटा येथे दिसरे गोल रिंगण होऊन पालखी वेळापूर येथे मुक्कामी येणार आहे. तर संत तुकारम महाराजांची पालखी अकलूज येथून प्रस्थान ठेवून माळीनगर उभे रिंगण झाल्यावर बोरगाव मुक्कमी असणार आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *