मुंबई, 24 जून : दूध हा अतिशय संतुलित आहार मानला जातो. दररोज दुध पिण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. कारण यामध्ये असलेले कॅल्शियम आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात.
साधारणपणे, लोक गाय आणि म्हशीचे दूध भरपूर घेतात, परंतु आता पॅकेज केलेले दूध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की साधं दुध लगेच खराब होतं, तेच पॅक केलेलं दूध जास्त दिवस ताज कसं रहातं. अखेर यासाठी कोणती पद्धत अवलंबली जाते. चला याबद्दल जाणून घेऊया कारण कधी कधी तुम्ही देखील अशा प्रकारचे दूध वापरत असाल.
वास्तविक, तज्ञांच्या मते, ताजे दूध हे सर्वोत्तम आहे, परंतु ताजे दूध न मिळाल्याने लोक पॅकबंद दूध देखील खूप वापरतात. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकबंद दुधाच्या पॅकेटची शेल्फ लाइफ चांगली असते. फ्रीजशिवायही ते बरेच दिवस खराब होत नाहीत. याचे कारण काय.
याचे मुख्य कारण म्हणजे दूध जास्त काळासाठी साठवण्यापूर्वी ते जास्त तापमानात गरम केले जाते. ते गरम केले जाते कारण असे केल्याने त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात. यानंतर ते सीलबंद पॅकबंद कंटेनरमध्ये साठवले जाते. दुधातील सूक्ष्मजीव नष्ट झाल्यामुळे ते खराब होण्याची प्रोसेस देखील कमी होते.
दुधाचा डबा ऑटोक्लेव्हमध्ये 110-120 डिग्री सेल्सिअस तापमानात 20-25 मिनिटांसाठी पूर्णपणे गरम केला जातो. यानंतर ते पुन्हा गरम केले जाते. चांगले उकळल्यानंतर, ते निर्जंतुकीकरण पॅकेजमध्ये पॅक केले जाते आणि सीलबंद केले जाते. एवढेच नाही तर मलई, फ्लेवर्ड मिल्क आणि कस्टर्ड यांसारखे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठीही ही पद्धत वापरली जाते.
जरी हे तंत्र दही आणि पनीरसाठी वापरले जात नाही. दुसर्या अहवालानुसार, ते वेगाने गरम करून आणि काही काळ उच्च तापमानात ठेवून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेला ‘अल्ट्रा हाय टेम्परेचर ट्रीटमेंट’ (UHT) म्हणतात. अशा प्रकारे, UHT प्रक्रियेमुळे, पॅक केलेले दूध ताजे राहते आणि त्याचे शेल्फ लाइफ वाढते. तज्ञ सांगतात की जेव्हा आपण पॅक केलेले दूध उघडतो, तेव्हा मात्र ते ताबडतोब थंड केले पाहिजे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही ते जास्त काळ फ्रेश रहाते.