
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.माझी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली आहे, परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे ट्विट करत शरद पवारांनी केले आहे.