Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

रशियात पुन्हा येणार पुतिन सरकार, ‘युनायटेड रशिया’ला ४५० पैकी ३५५ जागा मिळण्याचा अंदाज; विरोधकांना निवडणुकांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला यशस्वी

स्को – रशियाच्या संसदेत सत्ताधारी ‘युनायटेड रशिया’ पक्षाने आपले बहुमत कायम राखले आहे. विरोधी पक्षांच्या बहुतांश उमेदवारांना निवडणुकीपासून दूर ठेवत ही निवडणूक पार पडली. ९५ टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवरील निकालांनुसार, पक्षाला २२५ पक्षनिहाय जागांसाठी झालेल्या मतदानात सुमारे ५८ टक्के मते मिळाली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ‘युनायटेड रशिया’ला संसदेत एकूण ४५० पैकी ३५५ जागा मिळू शकतात. संसदेतील ४५० जागांपैकी २२५ जागांसाठी पक्षांच्या यादीवर मतदान झाले. उर्वरित २२५ जागांसाठी स्वतंत्र मतदारसंघांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात आली. स्वतंत्र मतदारसंघांतील २०८ जागांवर युनायटेड रशियाचे उमेदवार आघाडीवर आहेत. या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या इतर काही छोट्या पक्षांनीही कनिष्ठ सभागृहात काही जागा जिंकल्या आहेत.

युक्रेनवरील आक्रमणानंतरची पहिली संसदीय निवडणूक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २०२२ मध्ये युक्रेनवर पूर्ण क्षमतेने आक्रमण सुरू केल्यानंतर झालेली ही पहिली संसदीय निवडणूक आहे. याशिवाय, युक्रेनमधील चार प्रदेशांतील रहिवाशांचा या निवडणुकीत समावेश करण्यात आला. हे प्रदेश रशियाने २०२२ मध्ये ताब्यात घेऊन बेकायदा विलीन केल्याचा आरोप आहे. २०१४ मध्ये रशियाने बेकायदा विलीन केलेल्या क्रिमियामध्येही मतदान घेण्यात आले. युक्रेनने या प्रदेशांमध्ये घेण्यात आलेल्या मतदानाला बेकायदा ठरवले आहे.

विरोधकांवर कारवाई, माध्यमांवर नियंत्रण निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने विरोधकांवरील कारवाई अधिक तीव्र केली. रशियातील एकमेव उदारमतवादी आणि युद्धविरोधी पक्ष असलेल्या ‘याब्लोकोला’ पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले. या पक्षाला केवळ स्वतंत्र मतदारसंघांतील निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्याची परवानगीदेण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून युक्रेनमधील युद्धाला जनतेचा पाठिंबा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. माध्यमांवर कडक नियंत्रण ठेवल्याने विरोधकांचा प्रचार जनतेपर्यंत पोहोचला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *