Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यात रोजगार महाकुंभ; आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत नोकरीसाठी थेट मुलाखती

नागपूर : नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमात विविध क्षेत्रांतील कंपन्या आणि आस्थापना सहभागी होणार असून, रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.

कोणत्या क्षेत्रांत संधी?

रोजगार महाकुंभात आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, सेवा क्षेत्र, बँकिंग आणि एमएसएमई क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमधील विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये असलेल्या युवकांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

क्यूआर कोडद्वारे नोंदणीची सुविधा

उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार उपलब्ध नोकऱ्यांची माहिती मिळावी, यासाठी व्यापक नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजगार महाकुंभात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी नोंदणी करून उपलब्ध पदांची माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.आयटीपासून बँकिंग क्षेत्रापर्यंत, विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे! राज्यस्तरीय रोजगार महाकुंभात आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर, बँकिंग आणि एमएसएमई क्षेत्रांतील शेकडो उद्योजक व आस्थापने सहभागी होणार आहेत.

मुलाखतीपूर्वी मार्गदर्शन

नोकरी मिळवण्यासोबतच मुलाखतीत आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारीही आता रोजगार महाकुंभातून करून घेता येणार आहे! उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना मुलाखतीसाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने विशेष पूर्व-रोजगार मार्गदर्शन व कौशल्य विकास सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. उद्योगजगताच्या बदलत्या गरजांनुसार युवकांना प्रशिक्षित करणे, तसेच शिक्षण आणि रोजगार यांमधील दरी कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पात्र तरुण-तरुणींनी या रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

राज्यातील पात्र तरुण-तरुणींनी रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे! युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य संधी या मेळाव्यातून मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *