Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

भारतीयांसाठी 4 देशांचे व्हिजा नियम बदलले! 30 दिवसांसाठी मोफत ETA अन् बरंच काही, नवे नियम

परदेशात फिरण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सगळ्यात अगोदर व्हिजा आणि प्रवासाच्या नियमांविषयी अपडेट मिळवणे आवश्यक आहे. मुळात 2026 या वर्षात जगभरात अनेक तणावपूर्ण गोष्टी घडल्या तसेच घडत आहेत.अशात प्रत्येक देशाने सुरक्षा तसेच इतर मूलभूत गरजांना लक्षात घेता, परदेशी प्रवाशांसाठी असणाऱ्या नियमांत तसेच व्हिजा व्यवस्थेत महत्वाचे बदल केले आहेत. काही देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांसबंधीत नियमांमध्येही बदल केले आहेत.

मुळात व्हिजा म्हणजे एखाद्या देशात जाण्यासाठी त्या देशाच्या स्थानिक प्रशासनाकडून मिळवलेली परवानगी. तर ईटीए म्हणजे ऑनलाइन प्रवासाची परवानगी. काही देशांनी भारतासाठी असणाऱ्या याच दोन परवान्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एकंदरीत भारतीयांनी लाओस, श्रीलंका, चिली, घाना, व्हेनेझुएला तसेच इराण या देशांमध्ये प्रवास करण्याअगोदर तेथील बदलण्यात आलेले नवे नियम लक्षात घ्यावे.

लाओस देशाचा ई-व्हिजा देशातील प्रत्येक एंट्री पॉइंटवर चालत नाही. त्यामुळे तो मिळवण्याअगोदर त्याचे नियम तपासणे महत्वाचे आहे. हा ई-व्हिजा देशातील फक्त 9 ठराविक प्रदेश केंद्रावरच स्वीकारला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लाओसमध्ये प्रवेश करताना प्रवासाच्या पासपोर्टची वैधता 180 दिवसांपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.

श्रीलंका : भारतीयांसाठी मोफत टुरिस्ट ईटीएफ सुविधा

श्रीलंका भारतासह इतर 40 देशांना मोफत टुरिस्ट ईटीए पुरवत आहे. ईटीए म्हणजे एखाद्या देशात पर्यटनासाठी जाण्यापूर्वी घेतलेली देशाची परवानगी. श्रीलंकेने ही परवानगी अगदी मोफत दिली असून त्यावर डबल एंट्रीची सुविधा दिली आहे. एकंदरीत प्रवाशाला या ईटीएच्या आधारावर श्रीलंकेत दोनदा प्रवेश घेता येणार आहे. या ईटीएची मुदत 30 दिवसांची आहे. जर एखाद्या प्रवाशाला 30 दिवसांपेक्षा जास्त काळ श्रीलंकेत राहायचे असेल तर मुदत वाढवण्याची मुभा देण्यात आली आहे परंतु त्यावर लागू शुल्क आकरण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *