Navgan News



Add Space

क्राईमताज्या बातम्या

‘आजी, ते काका वाईट आहेत…’ पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, कसं बाहेर आलं प्रकरण?

Crime News : ओळखीच्या व्यक्तीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने तो व्यक्ती ‘वाईट’ असल्याचे सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, शुक्रवारी (4 ऑगस्ट) आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

 

अत्याचार अन् जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जयपूर परिसरातील ही घटना आहे. अत्याचाराची घटना सुमारे 15 दिवसांपूर्वी घडली. आरोपी ओळखीचा असल्याने कुटुंबाच्या घरी येत-जात होता. घटनेच्या दिवशी मुलगी एकटी असताना आरोपीने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या चिमुरडीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

 

असं बाहेर आलं प्रकरण

तीन दिवसांपूर्वी आरोपी पुन्हा भेटण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरी आला. त्यावेळी आजीसोबत खेळत असलेल्या मुलीने त्याला पाहताच, “अंकल वाईट आहेत,” असे म्हटले. सुरुवातीला आजीने याकडे लहान मूल समजून दुर्लक्ष केले, मात्र मुलीने काहीतरी सांगितले असावे या संशयातून आरोपीने मुलीकडे त्याबद्दल विचारणा केली. आरोपी निघून गेल्यानंतर मुलीने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला.

कुणकुण लागताच आरोपी फरार

कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीची कुणकुण लागताच आरोपी पसार झाला होता. पोक्सो कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने कसून शोध घेत आरोपीचा माग काढला आणि जैसलमेरमधील रामदेवरामधून त्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याला न्यायालयात समोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *