Navgan News



Add Space

महाराष्ट्र

जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्हाला उत्तर मिळणार, जैन मुनी निलेशचंद्र यांची मनसेला वॉर्निंग

मुंबई : जैन धर्मीयांनी रस्त्यावर मारलेल्या पांढऱ्या पट्टयांवरुन आज दादरमध्ये मोठा वाद झाला. याआधी घाटकोपरमध्ये वाद झालेला. जैन धर्म गुरुंना चालण्यासाठी या पांढऱ्या पट्टया मारण्यात आलेल्या.

 

त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अशी भूमिका मनसेने मांडली. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ या पांढऱ्या पट्टया आल्यानंतर त्यांनी इशारा दिला. त्यांनी दुपारी 3 पर्यंतची वेळ दिली होती. 3 पर्यंत पांढरी पट्टी काढा नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ असा संदीप देशपांडे यांनी इशारा दिला होता. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून मुंबई महापालिकेने तात्काळ तिथे जाऊन या पांढऱ्या पट्टया हटवल्या.

 

आता जैन मुनी निलेशचंद्रयांनी मनसेला इशारा दिला आहे. “पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे. राज्यातला अनेक मंदिरांमध्ये पांढरा रंग मारलेला आहे. संदीप देशपांडे यांनी भिवंडी मध्ये जावं, त्या ठिकाणी सर्व हिरवं हिरवं आहे” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले. “येत्या काळात मनसेला उत्तर योग्य वेळी दिले जाईल. जैन धर्म गुरू यांना चालण्यासाठी त्या पट्ट्या मारल्या आहे तो काही दहशतवाद नाही. अशा पद्धतीने जातियवाद करतात म्हणून मनसेचे आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येत नाहीत” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले.

 

‘असं नाहीय की जैन समाज शांतीप्रिय आहे’

“भारतात सर्व पंथ, संप्रदायाना आपल्या धर्माचं पालन करण्याच माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अधिकार दिला आहे. कुठल्याही धर्माचा अपमान करणं हे कायद्याच्या विरुद्ध आहे. संदीप देशपांडे तुम्ही दोन धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. असं नाहीय की जैन समाज शांतीप्रिय आहे. जैन समाज शांती प्रिय आहे. सफेद रंग शांततेचा प्रतीक आहे. जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल” असा थेट इशाराच निलेशचंद्र मुनी यांनी दिला.

 

‘जितका धोका जैनांपासून नाही, तितका मुस्लिमांपासूनआहे’

“माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा महाराष्ट्रात जीतयवाद, धर्मवाद नव्हता. आज बाळासाहेब नाहीत, त्यामुळे त्यांचे विचारही संपले आहेत. संदीप देशपांडे महाराष्ट्राला जितका धोका जैनांपासून नाही, तितका मुस्लिमांपासूनआहे. मुंब्र्यामध्ये जा तिथे काळीपट्टी लावा” असं संदीप देशपांडे यांना जैन मुनीने सुनावलं.

 

‘तिथे तुम्ही कधी जाणार, मुस्लिमांचं तोंड काळ करण्यासाठी’

“आता मी डहाणूला गेलेलो 25 हजार लोक धर्म सभेत सहभागी झाले होते. तिथे लव्ह जिहाद झालय. तिथे तुम्ही कधी जाणार, मुस्लिमांचं तोंड काळ करण्यासाठी. दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आम्ही तुम्हाला योग्यवेळी उत्तर देऊ” असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *