Navgan News



Add Space

क्राईमनवगण विश्लेषण

फसवणुकीचे बहुरूपी साम्राज्य उघड,डिजिटल अवतार अखेर जाळ्यात; एक-दोन नव्हे, तब्बल २५ महिलांशी प्रेम, लग्‍न अन् कोट्यवधीची लूट…

ठाणे : वृत्तपत्रातील विवाह जाहिराती, मॅट्रिमोनियल साईटस्‌, खोटी नावे, बनावट ओळखी आणि लग्नाचे आमिष… या सगळ्यांच्या जोरावर देशभरातील महिलांना गंडवणारा एक आधुनिक ‘लखोबा लोखंडे’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

मुलगाही बापाच्या कृत्यात सहभागी

तपासात आरोपीचे खरे नाव अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर त्याचा मुलगा अविरल ऊर्फ प्रखर त्रिवेदी हाही या फसवणूक रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे.

फसवणुकीचे बहुरूपी साम्राज्य उघड

देशभरातील दिव्यांग, घटस्फोटित, मतिमंद आणि असहाय अशा २५ हून अधिक महिलांना या भामट्याने प्रेम, विवाह आणि सुखी संसाराचे स्वप्न दाखवून लुटल्याचे तपासात समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *