Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्या

रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल…

वॉशिंग्टन/मॉस्को : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी तीन दिवसांच्या युद्धविरामासाठी संमती दर्शवली आहे. या काळात दोन्ही देशांकडून प्रत्येकी १,००० युद्धकैद्यांची अदलाबदलदेखील केली जाणार आहे.

 

हा युद्धविराम शनिवार (९ मे) ते सोमवार (११ मे) पर्यंत लागू असेल.

 

९ मे रोजी रशियामध्ये ‘विजय दिन’ साजरा केला गेला. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन ट्रम्प यांनी दोघांना युद्ध थांबविण्याची विनंती केली. मी विनंती केली आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन तसेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की दोघेही लगेच तयार झाले. हा काळ शांततेचा असेल, ज्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

 

कैद्यांचे हस्तांतरण

 

या करारानुसार रशिया आणि युक्रेन प्रत्येकी १,००० कैदी एकमेकांना सोपवणार आहेत. झेलेन्स्की यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, रशियातील सोहळ्यापेक्षा आमच्या सैनिकांचे प्राण आणि त्यांची घरवापसी अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *