Stock Market : शेअर बाजार मोठी घसरण! सेन्सेक्स 400 अंकांनी खाली; कोणते शेअर्स दबावात?

Sensex and Nifty Today: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते.
सकाळच्या सत्रात निफ्टी50 निर्देशांक 114 अंकांनी घसरून 24,221 च्या आसपास व्यवहार करत होता. तर सेन्सेक्समध्ये तब्बल 406 अंकांची घसरण होऊन तो 77,488 वर पोहोचला.
मोठ्या बाजाराच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात कमी चढ-उतार दिसून आला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.06 टक्क्यांनी खाली आला, मात्र निफ्टी स्मॉलकॅपमध्ये 0.05 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली.
सकाळच्या सत्रातील व्यवहार
आजच्या व्यवहारात KOTAKBANK, RELIANCE, HDFCBANK, Eternal, Mahindra & Mahindra, Coal India आणि Axis Bank हे शेअर्स टॉप लूसर्स ठरले.
दरम्यान, ASIANPAINT, BEL, TECHM, HINDUNILVR, ADANIPORTS आणि ITC या शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ दिसली.
या सेक्टरवर आज दबाव?
सेक्टरनिहाय पाहिल्यास आज सकाळी प्रायवेट बँक, पीएसयू बँक, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये अधिक दबाव दिसून आला. दुसरीकडे IT आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्ष लवकर संपण्याची शक्यता कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किंमती वाढल्या. ब्रेंट क्रूडचा दर 1.43 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 101.48 डॉलरवर पोहोचला.
तिमाही निकाल
ABB India, Bank of Baroda, Kalyan Jewellers India, Multi Commodity Exchange of India, Shipping Corporation of India, Swiggy, Tata Consumer Products, Titan Company या प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल आज असल्याने याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष्य आहे.
IPO
OnEMI Technology Solutions या कंपनीचे शेअर्स आज शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरला ₹27 प्रीमियम मिळत असल्याची चर्चा असून, त्यामुळे शेअरची लिस्टिंग सुमारे ₹198 वर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



