ऑक्सिजन कमी होणार, सूर्याची उष्णता वाढणार; नासाकडून भीतीदायक भविष्यवाणी, या दिवशी होणार पृथ्वी नष्ट…

NASA Supercomputer Prediction : अमेरिका – इराण यांच्यामधील युद्धामुळे गेल्या महिन्याभरापासून जगावर अनेक संकट कोसळली आहे. इंधन आणि तेल तुटवड्यामुळे अनेक देशांवर एनर्जी लॉकडाऊनची वेळ आली आहे.
अशातच जगप्रसिद्ध भविष्यवर्ता बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडॅमस यांनी केलेल्या भविष्यवाण्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ज्यामुळे मानवी जातीमध्ये भीतीदायक वातावरण आहे. पण आता नासाकडून अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे, जे ऐकून जगातील मनुष्याचा पायाखालची जमीन सरकेल.
काय आहे नासाची भविष्यवाणी?
नासाचे शास्त्राज्ञ हे विश्वाच्या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनातून धक्कादायक खुलासा झाला आहे. पृथ्वीचा अंत कधी होणार या तारखेबद्दल त्यांनी संकेत दिले आहेत. काझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर रेनहार्ड यांच्या या ताज्या संशोधनानुसार, जगण्यासाठी मानवाला ऑक्सिजनची गरज असते. हेच ऑक्सिजन कायम पृथ्वीवर टिकणार नाही.
खरं तर, नासाच्या सुपरकॉम्प्युटरने सूर्याच्या बदलत्या स्थितीचा आणि पृथ्वीच्या रासायनिक चक्रांचा एक नकाशा तयार केला आहे. हा नकाशा पाहून शास्त्रज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना भयानक धक्का बसला. या नकाशानुसार पुढील 1 अब्ज वर्षांत सूर्य इतका उष्ण होईल की, आपल्या हवेतून ऑक्सिजन नाहीसा होईल.
यावेळी शास्त्रज्ञांनी हेही सांगितलं की, त्यांना संशोधनातून असं वाटत होतं की, पृथ्वीवरील ऑक्सिजन गायब होण्यासाठी 2 अब्ज वर्षे आहेत. पण आता तो कालावधी निम्मा झाल्यामुळे भयावह स्थिती लक्षात येत आहे. जसजशी सूर्याची उष्णता वाढणार आहे, तसतसे समुद्राचे पाणी बाष्पीभवन होण्यास सुरुवात होईल आणि ऑक्सिजन तयार करणारे सूक्ष्म जीव नष्ट होणार असं भयावह चित्र दिसून येत आहे.



