Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Video : पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला,एअरबेसमध्ये घुसले दहशतवादी; जबरदस्त गोळीबार

Spread the love

पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पंजाबमधील मियांवाली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर आत्मघातकी हल्लेखोरांसह सशस्त्र दहशतवादी घुसले असून सुरक्षा दल आणि दहशतवादी अशी दोन्ही बाजूंनी फायरींग केली जात आहे.

मियांवाली एअरबेसमध्ये अनेक दहशतवादी घुसले असून त्यानंतर सलग अनेक स्फोट झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील समोर आला असून येथे झालेल्या स्फोटांमुळे एअरबेसमध्ये आग लागली आहे. तसेच एअरबेसवरून जोरदार गोळीबार आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहेत.

 

दरम्यान तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानचा प्रवक्ता मुल्ला मुहम्मद कासिम याने मियांवालीच्या एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांने दावा केला आगे खी या हल्ल्यात आत्मघाती हल्लेखोर देखील सहभागी आहेत. आज तकने यासंबंधीचे वृत्त दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *