विड्याचे पान बनवताना हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे सुपारी. ज्याला इंग्लिश मध्ये बीटल नट असे देखील म्हणतात. मात्र विड्याचे पान बनवण्या व्यतिरिक्त सुपारीचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही. सुपारीच्या योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे बऱ्याचशा आजारांमध्ये लाभ होतो व दुखण्यात गुण येतो.
आयुर्वेदामध्ये सुपारीचे महत्त्व वर्णन केले आहे. सुपारीपासुन आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. सुपारीचे चूर्ण, काढा, पेस्ट वापरून वेगवेगळ्या आजारांत उपचाराकरता औषधांमध्ये त्याची योग्य मात्रा रुग्णांना दिली जाते. बर्याचशा लोकांना कायमच तोंड येणे म्हणजेच तोंडामध्ये फोड येण्याची समस्या असते. वातावरणामधील उष्णता वाढली की लोकांचे तोंडे येते व ओठांच्या व तोंडाच्या आत पांढरे फोड व चट्टे येऊ लागतात. कधीकधी लालसरपणा देखील येतो व खाणे पिणे बंद होण्याची वेळ येते.
सुपारी खाण्याचे हे 9 आरोग्यदायी फायदे माहिती आहे का ?
विड्याचे पान बनवताना हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे सुपारी. ज्याला इंग्लिश मध्ये बीटल नट असे देखील म्हणतात. मात्र विड्याचे पान बनवण्या व्यतिरिक्त सुपारीचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही. सुपारीच्या योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे बऱ्याचशा आजारांमध्ये लाभ होतो व दुखण्यात गुण येतो.
आयुर्वेदामध्ये सुपारीचे महत्त्व वर्णन केले आहे. सुपारीपासुन आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. सुपारीचे चूर्ण, काढा, पेस्ट वापरून वेगवेगळ्या आजारांत उपचाराकरता औषधांमध्ये त्याची योग्य मात्रा रुग्णांना दिली जाते.
बर्याचशा लोकांना कायमच तोंड येणे म्हणजेच तोंडामध्ये फोड येण्याची समस्या असते. वातावरणामधील उष्णता वाढली की लोकांचे तोंडे येते व ओठांच्या व तोंडाच्या आत पांढरे फोड व चट्टे येऊ लागतात. कधीकधी लालसरपणा देखील येतो व खाणे पिणे बंद होण्याची वेळ येते.
सुपारी
तोंड येण्याच्या समस्येमुळे जेवण जात नाही व तोंडाची आग होते. आयुर्वेदामध्ये तोंड येण्यावर सुपारीचे सेवन करणे हा उपाय सांगितला आहे. महिलांनादेखील मासिक पाळीसंबंधी दुखण्यांमध्ये सुपारीचा औषधी वापर सांगितला आहे. उलटी,मळमळ,खोकला यांसाठी सुपारीचे योग्य प्रमाणात सेवन करणे आयुर्वेदामध्ये लाभदायी सांगितले आहे. सुपारी ची वेगवेगळी नावे आहेत. सुपारीला अरेका कटेचु म्हटले जाते. भारताच्या विविध भागात सुपारी, कसेली, सोपारी व सुपाड़ी या नावाने देखील सुपारीला ओळखले जाते. सुपारीला इंग्रजी मध्ये अरेका नट, बीटल नट पाम आणि बीटलपाम या नावाने ओळखले जाते. सुपारीचे उत्पादन मुख्यत्वे दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिकेमधील अनेक भागांमध्ये घेतले जाते. सुपारीला भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. चला तर जाणुन घेऊया सुपारीचे काही उपयोग:
तोंड येणे किंवा तोंडात फोड येणे :
तोंड येण्याकरता सुपारीचा उपयोग कशा प्रकारे केला जातो याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. एक ग्रॅम सुपारी पावडर, वेलची पावडर आणि ग्लिसरीन एकत्र करून ज्या ठिकाणी तोंडात फोड आले आहेत, त्या ठिकाणी लावावे. सुपारीमध्ये असलेल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे तोंडातील फोड लवकर बरे होतात. सुपारी खाण्याचे इतर फायदे:- बऱ्याच लोकांचे दात पिवळे झालेले असतात व त्यामुळे ते अतिशय घाणेरडे दिसतात. दात पांढरे व चमकदार होण्याकरता सुपारीची पावडर व बेकिंग पावडर एकास एक प्रमाण घेऊन त्याने दात घासल्यास दात पांढरे शुभ्र व चमकदार होतात. पायरिया हा एक तोंडाच्या संबंधित आजार आहे, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त स्राव होतो तसेच हिरड्या प्रचंड दुखतात. पायरिया झालेल्या रुग्णाला समाजामध्ये वावरतांना देखील न्यूनगंड निर्माण होतो व अशा व्यक्ती हसताना देखील घाबरतात. जर आपल्या कुटुंबातील कुणा व्यक्तीला किंवा आपल्याला पायरिया हा मुखआजार असेल एक ग्रॅम सुपारी पावडर आणि एक ग्रॅम पिंपळीचे पावडर एकत्र मिसळून त्याने हिरड्यांना मालिश करावी. त्यामुळे काही दिवसांतच हिरड्यांमधून रक्त येणे तसेच पायरियाची समस्या पूर्णपणे बरी होते.
डायरीया आणि जुलाबामध्ये:वारंवार जुलाब होणे तसेच डायरिया झाल्यास एक ते चार ग्रॅम सुपारी पावडर एक ग्लास बटरमिल्क सोबत दिवसातून दोन वेळा घेतल्यास डायरिया बरा होतो
मासिक पाळीची अनियमितता दूर करते: अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये खूपच त्रास व वेदना होतात. तसेच बऱ्याच महिलांना वेळेवर व नियमितपणे मासिक पाळी येत नाही. ज्यामुळे त्यांना हात -पाय व पोटर्या दुखणे, मूड्स बदलणे अशा समस्या होतात. बाजारात मिळणारा सुपारी पाक हा महिलांच्या या समस्येवर अतिशय गुणकारी मानला जातो. तीन महिन्यापर्यंत जर सुपारी पाकाचे एक चमचा सेवन रात्रीच्या वेळी कोमट पाण्यासोबत केले तर हा मासिक पाळीचा त्रास व अनियमितता कायमस्वरूपी दूर होते.
जखमा भरण्यासाठी उपयुक्त:-सुपारीचा वापर रक्त वाहणाऱ्या जखमांना थांबवण्यासाठी देखील केला जातो. याकरता सुपारीची पावडर जखमेवर लावल्यास रक्त येणे थांबते व जखमादेखील भरून येतात. सुपारीमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे जखम लवकर भरून येते.
सांधेदुखीच्या वेदनांमध्ये आराम मिळण्यासाठी:सांधेदुखी हा आजार आता अगदी लहान वयात देखील पाहायला मिळतो. सांधे सुजतात व सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात त्यामुळे शारीरीक हालचाल कमी होते. उठणे-बसणे अवघड होऊन जाते. याकरता सुपारी पावडर आणि तिळाचे तेल एकत्र करुन मसाज केल्याने सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. खोकल्यामध्ये उपयुक्त: माणसाला खोकला कोणत्याही ऋतूमध्ये येऊ शकतो व त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी देखील त्राद होतो. खोकल्याच्या समस्येवर उपाय म्हणून सुपारीचे एक पान चोखून खाल्ल्यास देखील खोकला पूर्णपणे थांबतो.
उलटी थांबवण्याकरता सुपारीचा उपयोग: ओकारी थांबण्यासाठी सुपारी वापरतात. बऱ्याच लोकांना बाहेर प्रवासात गेल्यानंतर जीव घाबरतो. मळमळ होते, उलट्या देखील सुरू होतात. सकाळी खाल्लेल्या जेवनाचे अपचन होते व उलट्या सुरू होतात. आपल्या देखील ही समस्या असेल व मळमळ होत असेल तर आपण याकरता एक ग्रॅम सुपारी पावडरमध्ये थोडीशी हळद मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा चघळत राहिल्यास ओकारी येण्यापासून अटकाव होतो.