पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. मात्र. त्याच वेळी, अंडी खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल बऱ्याच काळापासून वाद आहेत. अंडी हृदयासाठी चांगली नसल्याचा दावाही अनेकदा करण्यात आला आहे. परंतु, यासंदर्भात नेमका पुरावा अद्याप मिळालेला नाही. आजकाल जगभरातील डॉक्टर लोकांना आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यासाठी, रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर मग जाणून घेऊयात रोज अंडी खाण्याचे फायदे:- 1. अंड्यांमुळे आहार बनतो पोषकतत्वांनी भरपूर -एका मोठ्या आकाराच्या उकडलेल्या अंड्यामध्ये काय मिळते – व्हिटॅमिन A: RDA (Recommended Dietary Allowance) च्या 6%, फोलेट: RDA च्या 5%, व्हिटॅमिन B 5: RDA च्या 7%, व्हिटॅमिन B 12: RDA च्या 9%, व्हिटॅमिन B 2: RDA च्या 15%, फॉस्फरस: RDA च्या 9%, सेलेनिअम: RDA च्या 22% याच्या व्यतिरिक्त अंड्यामध्ये व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B 6, कॅल्शिअम आणि झिंक यांचा समावेश असतो. यासोबतच एका अंड्यामधून 77 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रथिने आणि 5 ग्रॅम फॅट्स मिळतात. या सर्व पोषकतत्वांमुळेच अंड्याला पौष्टिक आहार असे म्हटले जाते. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेली प्रत्येक पोषक गोष्ट अंड्यामध्ये असते.
2. अंडी खाल्ल्याने ‘वाईट’ कॉलेस्ट्रॉल वाढत नाही – अंड्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते हे खरे आहे. फक्त एका अंड्यामध्ये 212 ग्रॅम कॉलेस्ट्रॉल असते, जे दररोज शिफारस केलेल्या सरासरी सेवनाच्या (300mg) निम्म्याहून अधिक असते. आहारात जास्त कॉलेस्ट्रॉल असेल याचा अर्थ रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही जास्त असेल असे अजिबात नाही. यामागील कारण म्हणजे आपले यकृत दररोज भरपूर कॉलेस्ट्रॉल तयार करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आहारात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त घेतले तर यकृत त्याच्या वतीने कॉलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी करते.
शिवाय, अंडी खाल्ल्याने वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. एका अभ्यासानुसार, अंडी खाल्ल्याने सरासरी 70 टक्के लोकांमध्ये कॉलेस्ट्रॉल वाढत नाही. इतर 30 टक्क्यांमध्ये, अंडी काही प्रमाणात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवू शकतात. ब्रिटनची प्रतिष्ठित नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) देखील मानते की अंडी खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होत नाही.
3. HDL अर्थात ‘चांगले’ कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते अंडी:-न्यूट्रिशन
Updated on May 26, 2022, 13:49 IST
9 min read
अंडी खाण्याचे हे 9 फायदे तुम्हाला माहीत आहे का ?
iDiva Marathi
By मोनिका लोणकर
health benefits of eating one egg daily and side effects and allergies in marathi
idiva
पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. मात्र. त्याच वेळी, अंडी खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल बऱ्याच काळापासून वाद आहेत. अंडी हृदयासाठी चांगली नसल्याचा दावाही अनेकदा करण्यात आला आहे. परंतु, यासंदर्भात नेमका पुरावा अद्याप मिळालेला नाही. आजकाल जगभरातील डॉक्टर लोकांना आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यासाठी, रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर मग जाणून घेऊयात रोज अंडी खाण्याचे फायदे
अंड्याचे फायदे-तोटे यावरून सुरू आहे वाद – Egg good or bad debate
दररोज किती अंडी खाणे सुरक्षित आहे ? – How many Eggs per day are Safe
अंड्यांची साठवणूक कशी करायची ? – How to store eggs?
अंड्यांपासून अॅलर्जीची लक्षणे – Egg allergy Symptoms
अंड्यांपासून साल्मोनेला इन्फेक्शन होते का ? Does Egg cause salmonella infection?
1. अंड्यांमुळे आहार बनतो पोषकतत्वांनी भरपूर – Egg makes diet highly nutritious
idiva
एका मोठ्या आकाराच्या उकडलेल्या अंड्यामध्ये काय मिळते – व्हिटॅमिन A: RDA (Recommended Dietary Allowance) च्या 6%, फोलेट: RDA च्या 5%, व्हिटॅमिन B 5: RDA च्या 7%, व्हिटॅमिन B 12: RDA च्या 9%, व्हिटॅमिन B 2: RDA च्या 15%, फॉस्फरस: RDA च्या 9%, सेलेनिअम: RDA च्या 22% याच्या व्यतिरिक्त अंड्यामध्ये व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B 6, कॅल्शिअम आणि झिंक यांचा समावेश असतो. यासोबतच एका अंड्यामधून 77 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रथिने आणि 5 ग्रॅम फॅट्स मिळतात. या सर्व पोषकतत्वांमुळेच अंड्याला पौष्टिक आहार असे म्हटले जाते. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेली प्रत्येक पोषक गोष्ट अंड्यामध्ये असते.
2. अंडी खाल्ल्याने ‘वाईट’ कॉलेस्ट्रॉल वाढत नाही – Bad cholesterol does not increase
idiva
अंड्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते हे खरे आहे. फक्त एका अंड्यामध्ये 212 ग्रॅम कॉलेस्ट्रॉल असते, जे दररोज शिफारस केलेल्या सरासरी सेवनाच्या (300mg) निम्म्याहून अधिक असते. आहारात जास्त कॉलेस्ट्रॉल असेल याचा अर्थ रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही जास्त असेल असे अजिबात नाही. यामागील कारण म्हणजे आपले यकृत दररोज भरपूर कॉलेस्ट्रॉल तयार करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आहारात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त घेतले तर यकृत त्याच्या वतीने कॉलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी करते.
शिवाय, अंडी खाल्ल्याने वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. एका अभ्यासानुसार, अंडी खाल्ल्याने सरासरी 70 टक्के लोकांमध्ये कॉलेस्ट्रॉल वाढत नाही. इतर 30 टक्क्यांमध्ये, अंडी काही प्रमाणात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवू शकतात. ब्रिटनची प्रतिष्ठित नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) देखील मानते की अंडी खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होत नाही.
3. HDL अर्थात ‘चांगले’ कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते अंडी – Egg raise HDL Cholesterol
हाय डेनसिटी लिपोप्रोटिन म्हणजेच एचडीएल कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासही अंडी मदत करतात. एचडीएलला ‘चांगले’ कॉलेस्ट्रॉल असे ही म्हणतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या लोकांची एचडीएलची पातळी जास्त आहे, त्यांना हृदयविकार आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कमी असतो. त्याचवेळी, अंडी खाऊन तुम्ही तुमच्या एचडीएलची पातळी सहज वाढवू शकता. एका अभ्यासादरम्यान, असे दिसून आले की 6 आठवडे दररोज 2 अंडी खाल्ल्याने एचडीएलची पातळी 10 टक्क्यांनी वाढली.
4. अंडी मेंदूसाठी आवश्यक पोषकतत्व आणि कोलीनचा चांगला स्त्रोत:-कोलीन हे एक असे पोषकतत्व आहे, जे बहुतेक लोकांना पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. परंतु, हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो ‘ब’ जीवनसत्त्वासोबत जोडला जातो. शरिरामध्ये कोलीनचे अनेक कार्ये असतात, ज्यामध्ये सेल मेम्ब्रेन बनवणे हे प्रमुख कार्य आहे. ज्यामधून मेंदूमध्ये सिग्नलिंगचे रेणू तयार केले जातात. एका अंड्यामध्ये सुमारे 100 मिलीग्राम कोलीन असते.
5. डोळ्यांना निरोगी ठेवते अंडी:वाढत्या वयासोबत अनेकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अंड्यांमध्ये Lutein आणि Zeaxanthin नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. काही अभ्यासांमध्ये असे समोर आले आहे की, या पोषक घटकांचा आहारात पुरेशा प्रमाणात समावेश केल्यास मोतीबिंदूसह डोळ्यांच्या इतर आजारांचा धोका कमी होतो.
एका अभ्यासामध्ये, सुमारे साडेचार आठवडे दररोज एका व्यक्तीला अंड्यातील पिवळे बलक देण्यात आले. नंतर असे दिसून आले की, त्या व्यक्तीच्या रक्तातील ल्युटीनचे प्रमाण हे 28 ते 50 टक्क्यांनी वाढले, तर झेक्सॅन्थिनचे प्रमाण 114 ते 142 टक्क्यांनी वाढले होते. यासोबतच अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी अतिशय महत्वाचे असते. ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता हे अंधत्वाचे प्रमुख कारण मानले जाते.
6. हृदयासाठी फायदेशीर आहेत अंडी -सर्व अंड्यांमध्ये समांतर पोषकतत्वे नसतात. कोंबडीचे संगोपन कसे केले आणि त्यांना काय खायला दिले ? यावर अंड्यातील पोषक घटक अवलंबून असतात. ओमेगा-3 आहार दिलेल्या कोंबडीच्या अंड्यांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. हे ऍसिड रक्तातील ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण कमी करून कार्य करते. ट्रायग्लिसराईड्स हे हृदयविकारांच्या समस्यांवर चांगल्या प्रकारे काम करते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आठवड्यातून 2 ते 3 अंडी खाल्ल्याने ट्रायग्लिसराईड्सची पातळी 16 ते 18 टक्क्यांनी कमी होते.
तसेच, बऱ्याच काळापासून अंड्यांबद्दल वाद आहे की, ते हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. परंतु, आजपर्यंत या वस्तुस्थितीबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही. एका रिव्ह्यूची, 17 अभ्यास (ज्यामध्ये एकूण 2 लाख 63 हजार लोक सहभागी झाले होते) समिक्षा केली गेली, तेव्हा अंडी खाणे हे हृदयरोग किंवा स्ट्रोकशी संबंधित असल्याचे आढळले नाही. तसेच, काही मधुमेही रुग्णांमध्ये अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. परंतु, तरीही हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. 7. अंडी दर्जेदार प्रथिनांचा चांगला स्त्रोत – अनेक लोकांच्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असते. मात्र, प्रथिने ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असतात. प्रथिने ही शरिराच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्यांना ओळखले जाते. शिवाय, अंडी ही मांस आणि इतर डेअरी प्रॉडक्टसच्या तुलनेत किंमतीने स्वस्त असतात.
एका मोठ्या आकाराच्या अंड्यामध्ये 6 ग्रॅम पर्यंत प्रथिने असतात. यासोबतच अंड्यामध्ये अमिनो अॅसिडही योग्य प्रमाणात असते, ज्यामुळे अंडी खाल्ल्यानंतर आपले शरिर मिळालेल्या प्रथिनांचा पुरेपूर वापर करू शकते. आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने असल्याने वजन कमी होण्यास, स्नायूंचे प्रमाण वाढण्यास, रक्तदाब कमी होण्यास आणि हाडांचा विकास होण्यास मदत होते.
8. वजन कमी करण्यात करते मदत -अंड्यांमध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असल्याने ते वजन कमी करण्यात मदत करतात. अंड्यांचे सेवन केल्यानंतर आपले पोट बराच वेळ भरलेले राहते, त्यामुळे भूक लागत नाही. एका अभ्यासामध्ये, लठ्ठ महिलांना नाश्त्यामध्ये अंडी देण्यात आली आणि त्यानंतर असे दिसून आले की, त्या महिलांनी पुढील 36 तासांमध्ये कमी कॅलरीजचे सेवन केले. कारण, अंडी खाल्ल्यानंतर त्या महिलांना पोट बराच वेळ भरलेले असल्याचे जाणवले. दुसऱ्या एका अभ्यासात 8 आठवडे नाश्त्यात अंडी खाल्ल्याने वजन कमी झाल्याचे आढळले होते. किटो डाएटमध्ये अंडी देखील एक सुपर फूड आहे, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
9. व्हिटॅमिन्स शोषून घेण्यात करते मदत – जर तुम्ही इतर खाद्यपदार्थांसोबत आहारात अंड्यांचा समावेश केला तर त्याचा एक फायदा म्हणजे तुमचे शरिर जास्त जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) शोषून घेते. एका अभ्यासात, लोकांच्या आहारात सॅलेडसोबत अंड्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यातून असे आढळून आले की, ज्या लोकांच्या सॅलेडमध्ये अंड्यांचा समावेश आहे, त्यांनी अधिक व्हिटॅमिन ई चे शोषण केले होते.