ताज्या बातम्या

हरभरा खाण्याचे 8 आश्चर्यकारक फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ?


हरभरा खाण्याचे आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. खूप कमी लोकांना याबाबत माहिती आहे. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

हरभऱ्याचे फायदे पुढीलप्रमाणे –भरा खाण्याचे  आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. खूप कमी लोकांना याबाबत माहिती आहे. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

हरभऱ्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) हरभऱ्यामध्ये मॉलिक अ‍ॅसिड, ऑक्झालिक अ‍ॅसिड यांचं प्रमाण असल्यामुळं वांत्या (उलटी), अपचन अशा समस्या दूर होतात.

2) हरभरा हा स्नायूवर्धक आहे. त्यामुळं व्यायाम करणाऱ्यांनी याचं सेवन नियमित करावं. शरीराची झीज भरून काढण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

3) ओल्या हरभऱ्याच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी

4) कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर हरभरा डाळीचं पीठ प्रभावी जागेवर लावावं.

5) डाळीच्या पीठानं रंग उजळतो.

6) चेहऱ्यावर मुरूम असतील तर त्याचा एक चमचा दही आणि त्यात थोडंसं डाळीचं पीठ घालावं. हा लेप चेहऱ्याला लावावा. यामुळं मुरूम कमी होण्यास मदत होते.

7) केस रूक्ष किंवा कोरडे असतील तर डाळीच्या पीठानं केस धुवावेत.

8) सतत घाम येऊन शरीरातून दुर्गंधी येत असेल तर अंघोळ करताना डाळीच्या पीठाचा लेप लावावा.

अशा व्यक्तींनी हरभरा खाऊ नये

1) हरभरा डाळ पचण्यास जड आहे. तसंच ती उष्ण, तुरट-गोड चवीची आहे. त्यामुळं वातदोष वाढण्याची शक्यता असते. म्हणून वातप्रकृतीच्या लोकांनी हरभरा किंवा त्याच्या डाळीचं सेवन करू नये.

2) पचण्यास जड असल्यानं ज्यांची पचनशक्ती मंद आहे अशांनी किंवा अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी हरभरा खाणं टाळावं. डाळीच्या पदार्थांपासून तयार केलेले पदार्थ खाणंही टाळावं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *