ताज्या बातम्या

तीन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार


नागपूर : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, यामुळे संतापाचे वातावरण आहे.

नरेंद्र धनराज वांढरे (४५, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच मुलीचे पालक भाड्याच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. नरेंद्रची तिच्या पालकांशी ओळख होती व त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. १ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नरेंद्र त्यांच्या घरी गेला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत स्वत:च्या घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे मुलगी रडायला लागली व शेजारी राहणाऱ्यांनी लगेच तिच्या पालकांना माहिती दिली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता, तिने झालेला प्रकार सांगितला. आपल्यासोबत काय झाले, याची जाणही तिला नव्हती. तिच्या पालकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी नरेंद्रविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *