गेवराईताज्या बातम्याबीड जिल्हामहत्वाचेमहाराष्ट्र

ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळणार : अशोक हिंगे


ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळणार : अशोक हिंगे.

अशोक हिंगे यांच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांनी वंचित मध्ये प्रवेश केला.

गेवराई : नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडी पुर्ण जागा ताकदीने लढणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून त्या निवडणूका कशा पद्धतीने लढाव्या या अनुषंगाने दि. २ एप्रिल रोजी बैठकीत मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रणनिती आखण्यात आली.

सर्व समावेशक असलेल्या वंचित बहुजन आघाडीची वाढती लोकप्रियता पाहुन तसेच सर्व वंचित समाजाला सत्तेत भागीदारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, केजी ते पिजी मोफत शिक्षण देण्याची हि संकल्पना व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवुन मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकटा ता. गेवराई येथील माजी उपसरपंच बप्पासाहेब तुळशीराम शेंबडे,मा. ग्रामपंचायत सदस्य बाळू हापटे, अशोक शेंबडे, भारत गडदे, शाहु हापटे, बंडू शेंबडे, विष्णू गडदे यांनी प्रस्थापितांच्या कारभाराला वैतागून वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी बोलतांना ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण हे मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने मिळणार आहे. प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीला मते देणारा व मानणारा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहचून गाव तिथे शाखा स्थापन करा, तसेच पूर्वीपासूनच प्रत्येक महापुरुषांची जयंती वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतिने साजरी करण्याचे आदेश मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत तालुका पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, अनेक मराठा समाजाचे लोक पक्षात प्रवेश करत असून अनेक महत्वाच्या पदांवर जागा दिली जात आहेत. वंचित सत्तेत जाणार आहे कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये असे सक्त अदेशही हिंगे यांनी दिले.

नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात शासकीय विश्रामगृह गेवराई येथे दि.२ रोजी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे, महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, गेवराई तालुका निरीक्षक बबनराव वडमारे, पुष्पाताई तुरुकमाने, संतोष जोगदंड, सुदेश पोद्दार, बालाजी जगतकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. दस्तगिर शेख, किशोर भोले, किशोर चव्हाण,सुनिल धोत्रे, श्रीकृष्ण खेडकर,आनिल साळवे, अजय खरात, राजु गायकवाड, सुबोध कांडेकर, सुदाम मोरे, बाळासाहेब मुळिक, संतोष राठोड , सखाराम पोहिकर, राजेंद्र आडसुळ, प्रविण बांगर, बाजीराव बाबर,महादेव निकाळजे, नवनाथ प्रधान, बाबासाहेब निकाळजे, राहुल कोकाटे, बाळू भोले,विकास भोले, ज्ञानेश्वर हवाले, ई. शेकडो आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *