ताज्या बातम्या

कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांना अटक


रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना एका निर्जन ठिकाणी थांबलेल्या कारमधील तरुणांना हटकल्याने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी येथे एक एप्रिलच्या मध्यरात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

मितेश संजय परदेशी (वय 32), मनीष जयप्रकाश मेहता (वय 36) आणि सुमित राजेश परदेशी (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार रोहित बळवंत पाटील यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे उंड्री बीट मार्शल वर शासकीय कर्तव्य करत असताना त्यांना महंमदवाडीतील हॉटेल बीबीसी जवळ एक कार संशयास्पद अवस्थेत आढळली. त्यांनी जाऊन कारमधील इसमांकडे चौकशी केली असता आरोपी मनीष मेहता याने आम्हाला विचारणारा तू कोण? आम्ही कोण आहोत तुला माहीत नाही का? असे बोलून फिर्यादी यांची कॉलर पकडली.

फिर्यादी यांना धक्काबुक्की करून त्यांच्या शर्टाची बटन तोडले आणि गालावर चापट मारल्या. शिवीगाळ करत तुला इथेच संपवतो अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *